कारंजा लाड : अल्पवयीन साळीला तिच्या राहत्या घरातून जावयाने पळवून नेल्याची घटना १५ मे रोजी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोळी कारंजा येथे उघडकीस आली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून जावयाविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कारंजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोळी कारंजा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घराच्या कायदेशीर रखवालीत असताना, तिच्या मोठय़ा बहिणीचा पती घरी आला. नेहमीप्रमाणे जावईबुवा घरी आले असतील, असे घरच्या मंडळीला वाटले. घरी कुणी नसल्याची संधी पाहून जावईबुवाने अल्पवयीन साळीला शुक्रवारी दुपारी पळवून नेले. दरम्यान, या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या भावाने (रा. पापड वाढोणा जि. अमरावती ह.मु. कोळी कारंजा) ६ मे रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार नोंदविली. पीडित युवतीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी जावयाविरुद्ध फिर्याद नोंदविली. कारंजा शहर पोलिसांनी आरोपी शेख सलीम शेख मुनाफ (वय २५) रा. गवळीपुरा पुसद जि. यवतमाळ याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बायस ठाकूर व त्यांची चमू करीत आहे.
अल्पवयीन साळीला साळीला पळवून नेले
By admin | Updated: May 18, 2015 01:38 IST