शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना काळातही अल्पवयीन मुली ‘अनलॉक’; बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

वाशिम : काेराेना काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानासुध्दा ४ वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता ...

वाशिम : काेराेना काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानासुध्दा ४ वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता यामध्ये वाढ असल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण जास्त झाल्याचे पाेलीस दप्तरी असलेल्या नाेंदीवरून दिसून येते.

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधासह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊन काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काेराेना काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये एकूण ४३ मुलींची नाेंद करण्यात आली आहे. २०१९ मध्ये ५९, २०२० मध्ये ७० तर मे २०२१ पर्यंत २२ मुलींचा समावेश आहे. २०१८ ते २०२१ ची आकडेवारी पाहता दरवर्षी यामध्ये वाढच झाल्याचे दिसून येत आहे. यामधील अनेक प्रेमप्रकरणाचाच समावेश असल्याचे तपास कार्यातून दिसून येते.

...............

८० टक्के मुलींचा शोध लागला

सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण १९४ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ८० टक्केच्या जवळपास आहे. केवळ २० टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही. २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या १९४ मुलीपैकी १७१ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये ४१, २०१९ मध्ये ५२, २०२० मध्ये ६२ तर २०२१ मध्ये १६ मुलींचा समावेश आहे. २०१८ मधील ४३ पैकी केवळ २ मुलींचा शाेध लागला नसून चालू वर्षातील ६ मुलींचा शाेध पाेलीस विभागाकडून घेतल्या जात आहे.

..........

शोधकार्यात अडचणी काय?

बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते. परंतु ज्यांना सांगून जातात ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपास कार्यात अडचणी येतात. परंतु पाेलीस खाक्या दाखविल्याबराेबर अनेकजण पटकन सांगण्यास सुरुवात करतात.

........

काेराेना काळात काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता पाेलीस विभाग व्यस्त हाेता. पाेलिसांनी काेराेना काळात चांगले कार्य केले आहेत. दरम्यान अल्पवयीन मुलींचे अपहरण, बेपत्ता हाेण्याचे प्रमाण कमीच आहे. ज्या तक्रारी दाखल झाल्यात यात बहुतांशी प्रेम प्रकरण असे प्रकारच जास्त असतात.परंतु सर्वाचे शाेध लागलेत.

- शिवा ठाकरे,

पाेलीस निरीक्षक, वाशिम