वाशिम : बकर्या चारण्यासाठी गेलेला १३ वर्षीय मुलगा गेल्या दोन दिवसापासुन अचानक बेपत्ता झाला. या घटनेची तक्रार पिडीत मुलाच्या वडिलाने वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये २५ जानेवारीला दिली. पोलीसांनी अज्ञात इसमाविरूध्द भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. शेलुबाजार रोडवर वास्तव्यास असलेले इंद्रजीत जनार्दन ताजने यांचा १३ वर्षीय मुलगा धिरज हा २४ जानेवारीला बकर्या चारण्यासाठी सकाळी १0 वाजता घराबाहेर गेला. तेंव्हापासुन तो घरी परतला नाही. अखेर २५ जानेवारीला धिरज बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये इंद्रजीत ताजने यांनी दिली.
दोन दिवसापासून अल्पवयीन मुलगा बेपत्ता
By admin | Updated: January 27, 2016 23:27 IST