मालेगाव: मालेगाव ते वाशिम मार्गावरील अमानी गावाजवळील डॉ.अरुणबाबा इंगोले यांच्या समाधीजवळ एका टाटा ४०७ या मिनी ट्रक वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली . मालेगाव ते वाशिम मार्गावर वाशिम येथून संदीप नामदेव राऊत रा. मुंगळा हे आपल्या एम. एच. ३७ के. ५२ ३८ क्रमांकाच्या दुचाकीने मुंगळा येथे जात असताना हिंगोलीवरून एम.एच. ३० ए. बी. ३७४३ क्रमांकाच्या टाटा ४०७ या वाहनाच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. यामध्ये दुचाकीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार संदीप राऊत हा गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती मालेगाव पोलिसांना मिळताच जखमीला प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे दाखल केले. संदीप राऊत हा गंभीर जखमी असल्याने त्याला तातडीने अकोला येथे हलविण्यात आले. जखमीचा भाऊ सचिन नामदेव राऊत यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून शनिवारी रात्री उशिरा वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३५४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मिनी ट्रक-दुचाकीच्या अपघातात एक गंभीर
By admin | Updated: April 24, 2017 02:21 IST