उंबर्डाबाजार-पिलखेडा मार्गावरील घटनाउंबर्डा बाजार : येथून मनभा या गावाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अॅपे वाहनाचा सायकलस्वारास कट लागून वाहन उलटले. यात अॅपेमधील पाच प्रवासी जखमी झाले; तर सायकलस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की, उंबर्डाबाजार येथून मनभा या गावाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अॅपेचा (क्रमांक एम.एच.२० -एएस -२८७५) समोरून येणाऱ्या सायकलस्वारास कट लागल्याने सायकलस्वार अ.खलिल शे.फरीद (वय ६५ वर्षे, रा.उंबर्डा बाजार) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अॅपे उलटल्याने त्यातील प्रवासी सुखदेव राऊत (वय ५५ वर्षे, रा. पिंपरी वरघट) शिवाजी नागरगोजे (वय ४२ वर्षे, रा. वडगाव रंगे), राजू गुल्हाने (वय ४५ वर्षे, रा. पिलखेडा), राऊत डिलर (रा. पिंपरी), अॅपेचालक नितीन गुजर (वय ४० वर्षे) असे पाचजण जखमी झाले. अ.खलील शे.फरीद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उंबर्डाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयाकडे रवानगी करण्यात आली. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर कुणावरही कारवाई झालेली नव्हती.--
प्रवासी वाहन उलटले; पाच जण जखमी!
By admin | Updated: April 18, 2017 01:23 IST