शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

 परदेशी गुंतणूक, आॅनलाईन विक्रीच्या विरोधात वाशिमच्या व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:07 IST

वाशिम : आॅनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ तसेच किरकोळ व्यापारात थेट परदेशी गुंतवणूकीस विरोध म्हणून २८ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला वाशिम जिल्हयात व्यापाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व व्यापारी बंदमध्ये सहभागी आहेत, असा दावा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केला.कॉस्मेटीक, औषधी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्लास्टिक साहित्य आदिंचा व्यापार ठप्प होणार आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणची बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी पंचाईत झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : आॅनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ तसेच किरकोळ व्यापारात थेट परदेशी गुंतवणूकीस विरोध म्हणून २८ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला वाशिम जिल्हयात व्यापाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.वॉलमार्ट व फ्लिपकार्ट यांच्यात झालेला करार आणि किरकोळ व्यापारात थेट १०० टक्के परदेशी गुंतवणूकीचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंदमध्ये सहभागी आहेत, असा दावा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केला.वॉलमार्ट व फ्लिपकार्ट यांच्यात झालेला करार व किरकोळ व्यापारात थेट शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणूकीकरीता शासनाने परवानगी दिल्यामुळे ई कॉमर्सव्दारे सुईपासुन तयार होणारे कपडे, जोडे, चप्पल, कॉस्मेटीक, औषधी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्लास्टिक साहित्य आदिंचा व्यापार ठप्प होणार आहे. त्याचा निषेध करण्यासाठी व शासनाला याची जाणीव करुन देण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक या बंदमध्ये सहभागी झाले आहेत, असे कोठारी यांनी सांगितले. वाशिम शहरातील प्रमुख बाजारपेठेसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणची बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी पंचाईत झाली.कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्पजिल्ह्याभरातील व्यापारपेठ कडकडीत बंद असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प आहे. या बंदमुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याचा दावा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी केला.

औषध विक्रेत्यांचाही संप

‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट’, या संघटनेने औषधांच्या आॅनलाईन विक्रीला तीव्र विरोध दर्शवित शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदला वाशिम जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्याभरातील जवळपास ६२८ मेडिकल्स या बंदमध्ये सहभागी असल्याचा दावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी केला. केंद्रसरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषध विक्री करण्याचा दिलेला आदेश, ई-फार्मसीजना बिनधास्तपणे कार्य करण्याची दिलेली मुभा आदी बाबींचा निषेध नोंदविण्यासाठी हा बंद पुकारलेल्या आहे. या बंदमुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. जेनेरिक ‘मेडिकल्स’ सुरू!रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी बंदमध्ये सहभागी नसलेले जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शासकीय रुग्णालयांशी संबंधित औषध दुकाने सुरू आहेत. गरजू रुग्णांना औषध हवी असल्यास किंवा गैरसोय होत असल्यास जेनेरिक मेडीकल्स, शासकीय रुग्णालय किंवा अन्न व औषधी प्रशासन विभागाशी किंवा ९७३०१५५३७० या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन औषध निरिक्षक तथा सहायक आयुक्त (औषधे) एच. वाय. मेतकर यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStrikeसंप