राजरत्न सिरसाट/अकोलाव-हाडातील अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला असून, या भागात कृषीला पूरक दुग्धव्यवसायाचा जोडधंदा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, अकोल्याच्या स्थानकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थेंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयाची जोड मिळाली आहे. ही घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तद्वतच बुलडाण्याला शासकीय कृषी महाविद्यालय, कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. अकोल्यात पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय देण्यात यावे यासाठीचा ह्यलोकमतह्णने पाठपुरावा केला आहे, हे विशेष महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे झाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेली स्थानकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था पशुविज्ञान विद्यापीठाला जोडण्यात आली. या संस्थेत केवळ पदव्युत्तर शिक्षण देण्यात येत असल्याने पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांना मात्र या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे कठीण होते, पशुवैद्यकीय विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षणासह पीएच.डी. करायची असेल तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे; परंतु नागपूर येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सोडले तर विदर्भात दुसरे पदवी महाविद्यालयच नव्हते. याच पृष्ठभूमीवर येथील संस्थेला पदवी महाविद्यालय मिळावे यासाठीचा पाठपुरावा ह्यलोकमतह्ण ने केलेला आहे. या संदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केले आहे. पशुविज्ञान विद्यापीठाने त्यानंतर शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केल्याचे वृत्त आहे. या भागातील परिस्थिती आणि पशुवैद्यकीय अभ्यासक्रमापासून वंचित राहणार्या येथील विद्यार्थ्यांची स्थिती बघता शासनाने याबाबत लक्ष घातले असून, चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात पशुवैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आहे. तद्वतच बुलडणा जिल्हय़ासाठी शासकीय कृषी महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली आहे. वर्हाडातील विद्यार्थी, विद्यर्थिनींना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. अकोला, अमरावती जिल्हय़ातील औद्योगिक क्षेत्रात या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. भविष्यात नागपूर येथे होणार्या मिहान आणि कार्गोसाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. याच पृष्ठभूमीवर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अकोल्यात होणार पशुवैद्यकीय महाविद्यालय!
By admin | Updated: March 19, 2016 00:48 IST