शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांची मुदतवाढ संपली

By admin | Updated: July 5, 2014 00:37 IST

आता प्रतीक्षा निवडणुकीची

बीड: व्यावसायिक अभ्यासक्रमासह कृषीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत आहे. बीडमध्ये केवळ एकच कृषी महाविद्यालय असल्याने येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. विशेष म्हणजे बीडच्या कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात ओढा असल्याचे दिसून येत आहे.येथील आदित्य कृषी महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकी, अन्नतंत्र, अ‍ॅग्रीबायोटिक, कृषी अभियांत्रिकी या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. यात जास्तीत जास्त कृषीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एच. भुतडा यांनी सांगितले. येथील महाविद्यालयात कृषी शाखेसाठी एकूण १२० जागा आहेत. यापैकी १८ जागा व्यवस्थापन कोट्यातून भरल्या जाणार आहेत तर उरलेल्या ११२ जागा शासकीय कोट्यातून भरल्या जाणार असल्याचे आदित्य महाविद्यालयाचे संचालक आदित्य सारडा यांनी सांगितले. ११२ जागांसाठी आतापर्यंत ३०० च्या आसपास अर्ज आले असून, व्यवस्थापनाच्या १८ जागेसाठी १५० अर्ज आले असल्याचे प्रवेश प्रमुख बी.डी. नागरगोजे यांनी सांगितले. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची तारीख ११ जुलै असून, पहिला राऊंड १७ जुलै रोजी होणार आहे. तसेच व्यवस्थापन कोट्याच्या १८ जागेसाठी १३ आॅगस्ट ते २० आॅगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.येथून आले विद्यार्थीसध्या उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश या राज्यांपेक्षा आंध्र प्रदेश राज्यातील विद्यार्थी बीडच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. दररोज १८ ते २० अर्ज येत असल्याचेही प्राचार्य भुतडा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास आमचे प्राध्यापक सहकार्य करीत असल्याचे महाविद्यालयाचे आदित्य सारडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)