शिरपूर जैन : येथून जवळच असलेल्या गोवर्धना येथील २७ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणी माहेरच्या मंडळींच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी सासरच्या ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथील पुजा रवि अंभोरे हीचा सासरच्या मंडळीकडून घर खर्चासाठी माहेरहून पैसा आनण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. छळ असाह्य झाल्याने सदर विवाहित महिलेने २३ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले. तिला तात्काळ अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. उचारा दरम्यान तिचा २५ मे रोजी मृत्यू झाला. मृतक विवाहितेच्या आईने आज शिरपूर पोलिसात फिर्याद दिली. आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी पती रवि केशव अंभोरे, सासरा केशव वामन अंभोरे, सासू लक्ष्मी केशव अंभोरे, ननद बाली जितेंद्र लोणकर यांच्या विरुध्द कलम ४९८ अ, ३0६, ३४ भांदवी नूसार गुन्हा दाखल केला आहे.
जाचाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या
By admin | Updated: May 28, 2014 00:34 IST