कारंजालाड : पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणार्या पाच जणांविरूद्ध कारंजा पोलीसांनी ३ सप्टेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , स्थानिक बायपासवरील कोमल प्रविण ठाकरे (वय २२) या विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळीने ऑपरेशनकरिता १ लाख रूपयाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यावरून सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कारंजा पोलीसांनी हातोला येथील प्रविण अशोकराव ठाकरे, अशोकराव प्रल्हादराव ठाकरे, देवयानी अशोकराव ठाकरे, नितीन अशोकराव ठाकरे व किन्ही रोकडे येथील कृषि सहाय्यक फुके यांच्याविरूद्ध अपराध क्र.२३६ /१४ कलम ४१७, ४९८ (अ) ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पैशासाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: September 4, 2014 00:24 IST