शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सुरू होणार जिल्हय़ातील बाजार समित्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:51 IST

वाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस बंद असलेल्या जिल्हय़ातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवार, २३ ऑक्टोबरपासून पूर्ववत होणार आहेत. दरम्यान, गत पाच दिवसांत जिल्हय़ातील शेकडो शेतकर्‍यांना मातीमोल भावात शेतमालाची विक्री करावी लागली.

ठळक मुद्देदिवाळीदरम्यान शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान हमीभाव मिळण्याची आशा धूसर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस बंद असलेल्या जिल्हय़ातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवार, २३ ऑक्टोबरपासून पूर्ववत होणार आहेत. दरम्यान, गत पाच दिवसांत जिल्हय़ातील शेकडो शेतकर्‍यांना मातीमोल भावात शेतमालाची विक्री करावी लागली.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्‍यांना नानाविध समस्या, गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यंदाचे वर्ष हे शेतकर्‍यांच्या दृष्टीने सर्वच बाजूंनी निराशाजनक ठरले असून गतवर्षी विक्री केलेल्या सोयाबीनचे प्रतिक्विंटल २00 रुपये प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही. अनुदान मिळण्याची मागणी विविध पक्ष व संघटनांनी शासनस्तरावर केलेली आहे; मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. नाफेडमार्फत तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली; परंतु त्यातही विविध स्वरूपातील अडचणींचा शेतकर्‍यांना सामना करावा लागला. खरीप हंगामातही सुरुवातीपासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिल्याने हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबिनची पार दाणादाण उडाली. नैसर्गिक आणि बहुतांशी मानवनिर्मित या सर्व संकटांवर मात करीत शेतकर्‍यांनी सोयाबीनची सोंगणी केली आहे; परंतु सरासरी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून, झालेला लागवड खर्चदेखील वसूल होणे कठीण झाले आहे. आता सोयाबीनची विक्री करतानाही शेतकर्‍यांना विद्यमान व्यवस्थेपुढे हतबल होण्याची वेळ आली आहे. दिवाळीदरम्यान पाच दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्प भावात खासगी व्यापार्‍यांना तूरीची विक्री करावी लागली. यामध्ये शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.१८ ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत बाजार समित्या बंद होत्या. २३ ऑक्टोबरपासून बाजार समित्या पूर्ववत होत आहे; मात्र हमीभावाने शेतमालाची खरेदी होण्याची शक्यता अल्प असल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडण्याचे संकेत आहेत. नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी विविध पक्ष व शेतकरी संघटनांनी केलेली आहे. अद्यापही नाफेड खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही. -

टॅग्स :agricultureशेती