शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडसह, व्यापाऱ्यांच्या मालाची उचल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:33 IST

मंगळवारी बाजार समितीच्या शेडमध्ये असलेल्या नाफेडच्या मालासह व्यापाºयांचा मालही उचलण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासकांच्या सुचनेनुसार करण्यात आली. 

ठळक मुद्देव्यापाºयांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने सोयाबीनसह लाखो रुपयांचा इतर शेतमाल शनिवारी पावसात भिजला. शेडमध्ये पुरेशी जागा नसल्याने तो शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत उघड्यावर ठेवावा लागत होता.मंगळवार ५ जून रोजी बाजार समितीच्या शेडमधील नाफेड आणि व्यापाºयांचा शेतमाल उचलण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

वाशिम: तालुक्यात शनिवारी वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसामुळे वाशिम बाजार समितीत विक्रीसाठी शेतकºयांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापाºयांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने सोयाबीनसह लाखो रुपयांचा इतर शेतमाल शनिवारी पावसात भिजला. लोकमतने याबाबत रविवार ५ जून रोजी ‘पावसात भिजला लाखो रुपयांचा शेतमाल !’ वृत्त प्रकाशित करून शेतकºयांची समस्या उजागर करताच मंगळवारी बाजार समितीच्या शेडमध्ये असलेल्या नाफेडच्या मालासह व्यापाºयांचा मालही उचलण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासकांच्या सुचनेनुसार करण्यात आली. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचा लिलाव करण्यासह तो विक्री होऊन उचल होईपर्यंत सुरक्षीत राहावा म्हणून ११ शेड उभारले आहेत. यापैकी ६ शेडमध्ये नाफेड मार्फत खरेदी केलेला शेतमाल ठेवला होता. खरिप हंगाम तोंडावर आल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली असून, शेडमध्ये पुरेशी जागा नसल्याने तो शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत उघड्यावर ठेवावा लागत होता. वाशिम बाजार समितीत शनिवार ३ जून रोजीही हजारो क्विंटल शेतमाल विक्रीसाठी शेतकºयांनी आणला होता. या मालाचा लिलाव झाल्यानंतर मोजणी सुरू असतानाच अचानक वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांना सावरायची संधीच मिळाली नाही आणि लाखो रुपयांचा शेतमाल पावसात पूर्णपणे भिजला. यावेळी खाली मोकळा ठेवलेला शेतमाल सावडण्यासह भरलेली पोती उचलण्यासाठी व्यापारी, शेतकरी आणि हमा मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली होती. या संदर्भात लोकमतने रविवार ३ जून रोजी व्हिडिओसह वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर बाजार समितीच्या प्रशासकांनी नाफेडच्या खरेदीची जबाबदारी पार पाडणाºया संस्थेसह व्यापाºयांनाही त्यांचा शेडमधील माल उचलण्याच्या सुचना पत्राद्वारे केल्या. त्यानुसार मंगळवार ५ जून रोजी बाजार समितीच्या शेडमधील नाफेड आणि व्यापाºयांचा शेतमाल उचलण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यामुळे आता शेडमध्ये शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यास जागा होऊन त्यांचे नुकसान टळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम