शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

समानांतर साहित्य उत्सवात मराठीचा बोलबाला - मोहन शिरसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:19 IST

राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मोहन शिरसाट यांच्याशी साधलेला संवाद.

वाशिम : येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मोहन शिरसाट यांनी कवी, साहित्यीक आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटविला. २१ फेब्रूवारीपासून जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या जागतीक दर्जाच्या समानांतर साहित्य उत्सवात त्यांची ‘मराठीचे बोलू कौतुके’ या विषयावरील कार्यक्रमात प्रतिनिधीत्व व कविता वाचन करण्यासाठी निवड झाली. ही जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रासाठी भुषणावह बाब असून यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

समानांतर साहित्य उत्सवाचे वैशिष्ट्य काय?राजस्थान प्रगतीशील लेखक संघाच्या वतीने जयपूर येथे २१ ते २३ फेब्रूवारी या कालावधीत ‘पॅरलल लिटरेचर फेस्टीवल’ अर्थात समानांतर साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला. तब्बल १२७ सत्रांमध्ये चालणाºया या साहित्य मेळ्यात नेपाळ, भुतान, पाकिस्तान, बांग्लादेश यासह भारभरातून येणारे साहित्यिक आपापल्या प्रांतातील भाषा, संस्कृतीचा उलगडा करणार आहेत. भारतातील विविधतेचा गौरव करणारा हा महोत्सव जयपूरात अत्यंत लोकप्रिय आहे. महात्मा गांधी, मिर्झा गालिब यांच्या विचार साहित्यावरही उत्सवादरम्यान विशेष सत्र ठेवण्यात आले.

उत्सवातील तुमच्या सहभागाबद्दल काय सांगाल?समानांतर साहित्य उत्सवात भारतातील अन्य भाषांप्रमाणेच मराठी भाषेलाही विशेष महत्व देण्यात आले. त्यानुसार, ‘मराठीचे बोलू कौतुके’ या शिर्षकांतर्गत आयोजित कार्यक्रमात माझी महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघाकडून प्रतिनिधीत्व करण्यासाठी तथा कविता वाचन करण्यासाठी निवड झाली. हा आजवरच्या आयुष्यात आपणास मिळालेला बहुमान असल्याचे मी मानतो. उत्सवात मराठी भाषेचा विशेष बोलबाला राहिला.

इतर कुठले मान्यवर सहभागी आहेत?न्यायमूर्ती विनोद शंकर दवे, कवी ऋतुराज, नरेंद्र सक्सेना, राजेश जोशी, उदय प्रकाश, मंगेश डबराल, लीलाधर मंडलोई, अजय नावरिया, ममता कालिया, सुधा अरोडा, मृणाल तालुकदार, गीताश्री, जितेंद्र भाटिया, धिरेंद्र अस्थाना, रमशरण जोशी, विभूती नारायण राय, अरुण राय, नंदकिशोर आचार्य, प्रेमचंद गांधी, कैलास मनहर यांच्यासह भारतीय भाषांमधील ३५० पेक्षा अधिक साहित्यिकांनी समानांतर साहित्य उत्सवात सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत