शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा, मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी ७ आॅगस्ट रोजी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:50 IST

वाशिम : मानोरा व  मालेगाव  नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्दे ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता विशेष सभा होणार. अध्यक्ष पदाकरीता ४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानोरा व  मालेगाव  नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता विशेष सभा होणार. अध्यक्ष पदाकरीता ४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.मानोरा पगर पंचायतची सदस्य संख्या १७ एवढी आहे. त्यापैकी भारिप बहूजन महासंघ व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाचे ७ सदस्य, काँग्रेस ४, शिवसेना व भाजपा प्रत्येकी २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. विद्यमान नगराध्यक्ष रेखा पाचडे या भारिप बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाच्या आहेत. त्यांची निवड अविरोध झाली होती. आगामी नगराध्यक्ष पद अनुसुचित जातीकरिता आरक्षित आहे. भारिप बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्र मंडळाकडे मंजुुषा महेश निशाने, काँग्रेसकडे बरखा बेग आणि भाजपाकडे ज्ञानेश्वर गोतरकर हे तीन उमेदवार दावेदार आहेत. मालेगाव नगर पंचायतमध्ये एकूण सदस्य संख्या १७ असून  यामध्ये काँग्रेस चार, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसंग्राम चार, शिवसेना तीन, भाजप एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. आता नगराध्यक्ष पद खुला प्रवर्ग (महिला) असल्याने घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मालेगाव नगर पंचायतवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. राकाँच्या मीनाक्षी सावंत या विद्यमान नगराध्यक्ष आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल, अशी चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा उमेदवार नगराध्यक्ष होईल, अशी शक्यता असून, काँग्रेसतर्फे रूपाली टनमने, आफसाना सै. तस्लीम तर राकाँतर्फे रेखा अरूण बळी या दावेदार असल्याचे बोलले जात आहे. शिवसंग्रामचे चार सदस्य आणि शिवसेनेचे तीन सदस्य या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.मानोरा व मालेगाव येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता कायम टिकविण्यासाठी सत्ताधारी गटातर्फे तर सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोध गटातर्फे फिल्डिंग लावली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.अध्यक्ष पदाकरीता ४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार असून ७ आॅगस्ट रोजी  अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता विशेष सभा होणार असून या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून तहसिलदार कामकाज पाहणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराElectionनिवडणूक