मंगरूळपीर : शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होण्यासोबतच बहुतांश ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरविले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याप्रकरणी तत्काळ तोडगा काढून शुद्ध पाणीपुरवठा केला जावा, अशा मागण्यांचे लेखी निवेदन नगर परिषद कार्यालयात धडकत असल्याचे दिसून येत आहे.शहरातील वॉर्ड क्रमांक दहामध्ये वास्तव्यास असलेल्या आरीफ खान यांनी लेखी निवेदनाव्दारे नगर परिषद प्रशासनाला कळविले, की नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसून दूषित पाणी प्यावे लागत आहे. १५ दिवसांतून एखादवेळी नळाला पाणी येते, तेही दूषित. अवास्तव नळ कनेक्शन देण्याच्या नादात काही नगर परिषद कर्मचाऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी पाइपलाइन फोडून ठेवल्या आहेत. ही बाब प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही त्याची दखल घेतल्या जात नाही. याकडे वेळीच लक्ष पुरवून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आरीफ खान यांनी नमूद केले आहे.गत दहा वर्षांपासून पाणीपुरवठ्याची ‘फिल्टर प्लांट मशीन’ स्वच्छ झालेली नव्हती. त्याकडे लक्ष पुरवून ती स्वच्छ करून घेण्यात आली असून, मोटार दुरुस्तीची कामेही प्राधान्याने पूर्ण झाली आहेत. यासह पाणी स्वच्छ करण्याकरिता उच्च दर्जाच्या तुरटीचा वापर करण्यात येत आहे. मात्र, पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने हा प्रश्न बिकट बनत आहे. तरीदेखील शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.-डॉ.गझाला यास्मीन मारूफ खान, नगराध्यक्ष, मंगरूळपीर
मंगरूळपीरच्या नागरिकांना प्यावे लागतेय दूषित पाणी!
By admin | Updated: April 25, 2017 01:49 IST