शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

जलवाहिनी फुटली: मंगरुळपीरचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:37 IST

मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेली जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा फटकालोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): शहरातील पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून ठप्प आहे. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेली जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत असून, यावर नगर पालिका प्रशासनाकडून तातडीच्या उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७९४.५३ मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के होते. त्यामुळेच तालुक्यातील जलाशय काठोकाठ भरले आणि यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे दिसू लागले; परंतु वाढलेले रब्बीचे क्षेत्र, पाण्याचा अवैध आणि वारेमा उपसा, तसेच रखरखत्या उन्हामुळे वेगाने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील १५ पैकी निम्मे जलाशय कोरडे पडले. तथापि, मंगरुळपीर शहरासह इतर काही खेडेगावांना पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पात अद्यापही ४० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा आहे. त्यामुळे शहरवासियांसह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खेडेगावांत पुरेसा पाणी पुरवठाही करण्यात येत आहे. त्यात गेल्या आठवड्यात या प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जोडलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. शहरातील काही हातपंप बंद पडले असताना नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. नगर पालिका प्रशासनाने यावर तातडीचे उपाय करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी) लाखो लीटर पाण्याचा अपव्ययमंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाची जलवाहिनी दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांतच फुटण्याचे प्रकार घडतात आणि त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. यंदाही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे फुटलेल्या जलवाहिनीतून दरदिवशी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याच्या प्रकाराची तपासणीच नगर पालिका प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर