शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती लाचप्रकरणी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:42 IST

वाशिम:  सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत्यक्ष लाच स्वीकारणार्‍या खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देविहिरीच्या कार्यारंभ आदेशासाठी लाच खासगी इसमही ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणार्‍या मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत्यक्ष लाच स्वीकारणार्‍या खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले. उपसभापती सुभाष शंकरराव शिंदे व दिलीप महादेव अवगण अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराच्या भावाच्या नावाने सहस्त्र सिंचन विहीर मंजूर असून, सदर विहिरीचा कार्यारंभ (वर्क ऑर्डर) काढून देण्यासाठी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती सुभाष शंकरराव शिंदे (५0) रा. गोगरी यांनी १0 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने १२ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता सुभाष शिंदे यांनी तडजोडीअंती सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर मंगरूळपीर पंचायत समिती परिसरात सापळा लावण्यात आला. यावेळी सुभाष शिंदे यांनी लाचेची सहा हजार रुपयाची रक्कम खासगी इसम दिलीप महादेव अवगण रा. पिंप्री अवगण यांच्याकडे देण्यास सांगितले. अवगण यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच सुभाष शिंदे व दिलीप अवगन या दोघांनाही ताब्यात घेऊन लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नवृत्ती बोर्‍हाडे, पोलीस कर्मचारी भगवान गावंडे, नितीन टवलारकर, अरविंद राठोड, विनोद अवगळे आदींनी पार पाडली. 

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरCrimeगुन्हाArrestअटक