शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीरच्या युवकाने ‘पेन्सिल’वर साकारली गणरायांची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 13:52 IST

मंगरूळपीर : शहरातील एका अभियांत्रिकीमध्ये पदवीप्राप्त युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायक, गणरायांची प्रतिकृती साकारली आहे.

ठळक मुद्देमोहन झंझाड या युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायकांची प्रतिकृती बनविली.अभियांत्रिकीचे शिक्षण मोहनने पुर्ण केले असून काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याच्यामध्ये लहानपणापासूनच आहे.आठ पेन्सिलच्या टोकांवर आठ गणपतीची प्रतिकृती बनवून त्याने त्याच्यातील कलागुण प्रकट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : शहरातील एका अभियांत्रिकीमध्ये पदवीप्राप्त युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायक, गणरायांची प्रतिकृती साकारली आहे.  त्याच्या या उपक्रमाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळील कॉलनीमध्ये राहणाऱ्या मोहन झंझाड या युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायकांची प्रतिकृती बनविली. तब्बल आठ पेन्सिलच्या टोकांवर आठ गणपतीची प्रतिकृती बनवून त्याने त्याच्यातील कलागुण प्रकट केले. विशेष म्हणजे ही कला त्याला कोणीही शिकविली नसून त्याने आपल्या अंगी असलेल्या गुणात्मक कलेतून हे शक्य केले आहे. या कलेला ‘मायक्रो आर्ट’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे जेमतेम परिस्थितीतून अभियांत्रिकीचे शिक्षण मोहनने पुर्ण केले असून काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याच्यामध्ये लहानपणापासूनच आहे. त्याने अष्टविनायक, छत्रपती शिवाजी महाराज, शिव राजमुद्रा, ताजमहल, भारतीय चलनाची प्रतिकृती अशा अनेक प्रतिकृती मोहनने पेन्सिलच्या टोकांवर बनविल्या आहेत. अत्यंत सूक्ष्म व नाजूक असलेले पेन्सिलचे टोक साधारण व्यक्तीला हाताळताना तुटण्याची भीती असते. मात्र याच पेन्सिलच्या टोकांवर मोहनने आपली कला प्रगट करून दाखवली. मोहनच्या कलेला बघण्यासाठी अनेक मान्यवरांनी त्याच्या घरी जाऊन भेट दिल्या आणि त्याच्या या कलेचे कौतूक केले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर