लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम): स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये मंगळवारी ग्रामसेवकांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. २६ जानेवारीपर्यंत कुठल्याही स्थितीत तालुक्यात उभ्या झालेल्या शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात यावे, असे निर्देश यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी दिले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगरूळपीर तालुका ब-यापैकी हगणदरीमुक्त झाला आहे. २६ जानेवारी रोजी तालुका १०० टक्के हगणदरीमुक्त घोषित करायचा असल्याने शौचालयांची कामे पूर्ण झाल्याचे फोटो अपलोड करण्यात यावे, असे आवाहन यावेळी कापडे यांनी केले. याप्रसंगी गावनिहाय आढावा घेण्यात आला आणि फोटो अपलोड करण्याच्या कामात मागे असणाºया सचिवांना धारेवर धरण्यात आले. नादुरूस्त शौचालय आणि स्वच्छता इन्डेक्सबाबत सूचना करून त्यात प्रगती करण्याचे निर्देश दिले. यावेळी गटविकास अधिकारी खैरे, जिल्हा परिषदेचे राम श्रृंगारे, विस्तार अधिकारी भिकाजी पद्मने, आरोग्य विस्तार अधिकारी कल्पना सावळे, वाघमारे आदिंची उपस्थिती होती.
मंगरुळपीर : उभारण्यात आलेल्या शौचालयांचे फोटो २६ जानेवारीपर्यंत अपलोड करा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 19:55 IST
मंगरूळपीर (वाशिम): स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये मंगळवारी ग्रामसेवकांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. २६ जानेवारीपर्यंत कुठल्याही स्थितीत तालुक्यात उभ्या झालेल्या शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात यावे, असे निर्देश यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी दिले.
मंगरुळपीर : उभारण्यात आलेल्या शौचालयांचे फोटो २६ जानेवारीपर्यंत अपलोड करा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी
ठळक मुद्देमंगळवारी पंचायत समितीमध्ये घेतला ग्रामसेवकांच्या कामाचा आढावामंगरुळपीर तालुक्याची हगणदारी मुक्तीच्या दिशेने वाटचाल