शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:05 IST

मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी लाठी येथील भूमीहिन माता-पित्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली आहे. ओम भानुदास सुर्वे, असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, अवघे १७ वर्षे वय असलेल्या ओमच्या उपचारासाठी एक लाख रूपयांहून अधिक रकमेची गरज आहे; परंतु हातमजुरी करणारे माता-पिता त्याच्यावर उपचार कसे करावे, या चिंतेने व्यथित झाले आहेत. 

ठळक मुद्देउपचारासाठी लाखोंचा खर्च मोलमजुरी करून जगणारे आई-वडील व्यथित 

नाना देवळे / लोकमत न्युज नेटवर्क मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी लाठी येथील भूमीहिन माता-पित्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली आहे. ओम भानुदास सुर्वे, असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, अवघे १७ वर्षे वय असलेल्या ओमच्या उपचारासाठी एक लाख रूपयांहून अधिक रकमेची गरज आहे; परंतु हातमजुरी करणारे माता-पिता त्याच्यावर उपचार कसे करावे, या चिंतेने व्यथित झाले आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील रहिवासी भानुदास सुर्वे हे अठराविश्वे दारिद्र्यात मोलमजुरी करून कुटुंंबाचे उदरभरण करतात. त्यांचा ओम हा १७ वर्षीय मुलगा १२ व्या वर्गात शिकत असून, त्याला गेल्या दोन वर्षांपासून मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रासले आहे. त्याच्या आजाराव भानुदास सुर्वे यांनी पोट उपाशी ठेवून उपचार केले. नातेवाईकांचे कर्ज काढत चार वेळा त्याच्यावर वर्धा, वणी आणि अकोला येथे चार वेळा शस्त्रक्रियाही केल्या; परंतु ओमच्या दुर्दैवाने त्या चारही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या. आता त्याच्यावरी पुढील उपचारासाठी एक लाखाहून अधिक रुपयांची गरज आहे; परंतु त्याचे भानुदा सुर्वे आणि त्यांच्या पत्नी भूमिहीन शेतमजूर असल्याने मुलाचा उपचार करण्यात ते असमर्थ ठरत आहेत. पोटचा गोळा बरा होऊन त्याने शिक्षण घ्यावे आणि आपले भविष्य उज्जल करावे, असे स्वप्न उराशी बाळगून असलेले भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी हालाखीच्या परिस्थितीने हतबल झाल्या आहेत. पोटच्या गोळ्याचा वाढता आजार पाहून त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे समाजातील दानशुरांनी मदतीचा हात द्यावा, अशी आर्जव ते येथे तेथे फिरून करीत आहेत. दरम्यान, भानुदास सुर्वे यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन गावक-यांनी त्यांना थोडी आर्थिक मदतही केली आहे; परंतु त्यामध्ये उपचार करणे शक्य नसल्याने त्यांनी दानशूर व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :washimवाशिम