शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर : ‘नाफेड’कडून मालाच्या चुकार्‍यांना विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:17 IST

मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडीद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरेदी करून शेतकर्‍यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस उलटल्यानंतरही सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे या संदर्भात घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  शासनाला आपल्याच घोषणेचा विसर पडल्याचे स्पष्ट होत आहे. 

ठळक मुद्देशासनाला पडला विसरआठ दिवसांत चुकारे देण्याची घोषणा फोल!  

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडीद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरेदी करून शेतकर्‍यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस उलटल्यानंतरही सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे या संदर्भात घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  शासनाला आपल्याच घोषणेचा विसर पडल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने नाफेडच्यावतीने शेतमालाची खरेदी हमीभावाने करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात सहा शासकीय खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या ठिकाणी माल विकण्यासाठी शेतकर्‍यांची रीतसर नोंदणीही करण्यात आली.  शेतकर्‍यांना या ठिकाणी विकलेल्या शेतमालाचे चुकारे आठ दिवसांत देण्यात येतील असेही शासनाने जाहीर केले.  तथापि,  शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विकणार्‍या शेतकर्‍यांना १५ दिवसही चुकारे मिळत नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपूर्वी नाफेडच्यावतीने हमीभावात शेतमाल खरेदी सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत सुरुवातील उडीद आणि मुगाची खरेदी सुरू झाली आणि आजवर जिल्ह्यात ४0 हजार २२७ क्विंटल उडीद आणि ८८१ क्विंटल मूग शेतकर्‍यांकडून हमीभावात खरेदी करण्यात आला. त्यानंतर नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी सुरू झाल्यानंतर १४ डिसेंबरपर्यंत ४ हजार १९८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. शासकीय खरेदी केंद्रांवर विकलेल्या शेतमालाचे चुकारे शेतकर्‍यांना शासनाच्या घोषणेनुसार ८ दिवसांत मिळणे अपेक्षित आहे; परंतु जिल्ह्यातील सहाही केंद्रावर ४ डिसेंबरनंतर  खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे अद्याप अदा करण्यात आले नाही. संबंधित संस्थांनी काही शेतकर्‍यांना त्यांच्याकडील निधीतून चुकारे केले असले तरी, संबंधित संस्थांकडे आता पुरेसा निधी नसल्याने शेतकर्‍यांची पंचाईत होणार आहे. 

साठवणुकीनंतरच केली जाते निधीची मागणीराज्य शासनाच्यावतीने नाफेडसाठी जिल्ह्यात शासकीय केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल केंद्रीय किंवा राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत साठविण्यात येतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदी झालेल्या शेतमालाची आकडेवारी जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येते आणि त्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे अदा करण्यासाठी निधीची मागणी केली जाते, अशी माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून प्राप्त झाली.

शासकीय खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांकडून घेतलेला माल साठविण्यासाठी काहीवेळा तांत्रिक कारणामुळे विलंब होतो. त्यामुळे शेतमाल साठवणुकीपूर्वी खरेदी झालेल्या शेतमालाची प्रत्यक्ष आकडेवारी संबंधित कार्यालयाकडे प्राप्त होत नाही आणि त्यामुळेच या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने शेतकर्‍यांना नियोजित वेळेत चुकारे मिळणे कठीण झाल्याचे स्पष्ट होत आहे; मात्र जवळचा माल विकून झाल्यानंतर अनेक दिवस त्याचे पैसे मिळत नसल्याने जिल्हय़ातील शेतकर्‍यांमधून ‘नाफेड’च्या कार्यप्रणालीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम