शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मंगरूळपीर नगराध्यक्ष गजाला खान अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:46 IST

मंगरूळपीर (जि.वाशिम): मंगरुळपीर नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजाला यास्मिन खान यांनी नियमबाह्यरित्या पतीची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती केल्याने नगरविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयाने त्यांना नगराध्यक्षा पदावरून दूर करण्याचा निर्णय १६ जुलै रोजी दिल्याची माहिती २८ जुलैला प्राप्त झाली.

ठळक मुद्दे सहा वर्षांसाठी नगरसेवक म्हणून निवडून येण्यास डॉ. गजाला खान यांना अपात्र ठरविले आहे.डॉ. गजाला यास्मिन मारूफ खान यांना मंगरुळपीर नगराध्यक्षा पदावरून दूर करण्यात आले.

मंगरूळपीर (जि.वाशिम): मंगरुळपीर नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजाला यास्मिन खान यांनी नियमबाह्यरित्या पतीची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती केल्याने नगरविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयाने त्यांना नगराध्यक्षा पदावरून दूर करण्याचा निर्णय १६ जुलै रोजी दिल्याची माहिती २८ जुलैला प्राप्त झाली. तसेच सहा वर्षांसाठी नगरसेवक म्हणून निवडून येण्यास डॉ. गजाला खान यांना अपात्र ठरविले आहे.नगरविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयाने केलेल्या निवाड्यानुसार, सर्वसाधारण निवडणूक पश्चात मंगरुळपीर नगर परिषदेत दोन नामनिर्देशित सदस्य नियुक्त करावयाचे होते. याकरीता ८ जानेवारी २०१७ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. नियमानुसार सभाध्यक्षा म्हणून नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांनी पदनिर्देशित अधिकारी असलेले जिल्हाधिकारी यांनी संख्याबळाच्या आधारे अनुज्ञेय असलेली दोन सदस्यांची नावे जाहिर करणे आवश्यक होते. सभागृहात संख्याबळ पाहता भाजप एक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एक असे दोन अनुज्ञेय सदस्य पदे नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषीत करणे अपेक्षीत होते. पण नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांनी स्वत:चे पती अ‍ॅॅड. मारूफ खान यांची नियुक्ती नियमबाह्यरित्या घोषीत केली. याप्रकरणी १२ एप्रिल २०१७ रोजी कॉंग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग झाहेद बेग व माजी नगराध्यक्ष अशोक परळीकर यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वािशम जिल्हाधिकारी व अमरावती विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आले. अहवालानुसार नगराध्यक्षांनी अपल्या पदाचा गैरवापर केल्याचे सकृतदर्शनी सिध्द झाले. परंतू नियमानुसार त्यांना खुलासा सादर करण्याची संधी देण्यासाठी १८ सप्टेंबर २०१७ रोजी नोटीस देण्यात आली. यावर नगराध्यक्षा डॉ. खान यांनी २६ सप्टेंबर २०१७ ला निवेदनाद्वारे खुलासा सादर केला. खुलाशानंतरही तोंडी म्हणणे मांडण्यासाठी ९ मे २०१८ रोजी नगरविकास दालनात सुनावणी ठेवण्यात आली. त्यावेळी सर्वजण उपस्थित होते. परंतू नगराध्यक्षा अनुपस्थित होत्या. एकंदरीत प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी १६ जुलै रोजी निवाडा आदेश पारीत केले. त्यानुसार महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ च्या कलम ५५ ( अ ) व ५५ ( ब ) खालील तरतूदीनुसार डॉ. गजाला यास्मिन मारूफ खान यांना मंगरुळपीर नगराध्यक्षा पदावरून दूर करण्यात आले. तसेच आदेश दिनांकापासून सहा वर्षाच्या कालावधी करीता नगरसेवक म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.राजकीय द्वेषापोटी भाजपच्या नगरसेवकांनी, आमदारांनी आपले पक्षाचे राज्यमंत्री यांचेवर प्रचंड दबाव निर्माण करून चुकीचा व बिनबुडाचा आदेश माझ्या विरुद्ध न्यायालयात प्रलंबित प्रकरणात पारित केला आहे. त्यावर लवकरच न्यायालयातून न्यायनिवाडा होईलच.-डॉ. गजाला खाननगराध्यक्ष, नगर परिषद, मंगरुळपीर

 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील