शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:21 IST

मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

ठळक मुद्दे रुग्णालयात असलेल्या साहित्याची, दरवाजे, खिडक्या व इतर वस्तुंची तुटफूट झाली. गंभीर रुग्ण आल्यास कर्मचारी हजर नसल्यास त्याला दुसरीकडे उपचारास जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमनभा : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी शासनाच्यावतिने गावोगावी प्राथमिक आरोग्यकेंद्राची स्थापना केली. परंतु मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी रुग्णालय वाºयावर सोडून दिल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थायी आरोग्य अधिकारी नसल्याने आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे. रुग्णालयात असलेल्या साहित्याची, दरवाजे, खिडक्या व इतर वस्तुंची तुटफूट झाली. सद्या पावसाळयाचे दिवस असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ आहे, परंतु येथे कर्मचारी काही वेळेवर तर काही आपल्या सोयीनुसार येवून रुग्णांवर उपचार करतात. एखादयावेळी गंभीर रुग्ण आल्यास कर्मचारी हजर नसल्यास त्याला दुसरीकडे उपचारास जावे लागत आहे. याचा आर्थीक फटका गोरगरिब रुग्णांना बसत आहे.  या केंद्रात वैद्यकीय अधिकारी,  परिचारिका , औषधी वितरक कोणीही मुख्यालयी राहत नसल्याने या आरोग्य केंद्राकडे त्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्षदेणे गरजेचे असतांना सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. आरोग्य केंद्रातील शौचालयामध्ये खड्डे,तर टाके उघडे पडले आहे. दवाखान्याची  साफसफाई नियमित करण्यात येत नसून आरोग्य केंद्राभोवती सर्वत्र गाजर गवत निर्माण झाले आहे. रुग्णांवर उपचार केल्यास  आरोग्य केंद्रामध्ये औषधीचा तुटवडा हे नेहमीचेच झाले आहे. तसेच येथे येणारे आरोग्य अधिकारी सुध्दा नियमित बदल होतांना दिसून येत असल्याने नेमके येथे कोण कर्तव्यावर आहे हे ही कळेनासे झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून येथील आरोग्य केंद्राचा कारभार सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिम