लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील तरोळी येथील जनार्धन पांडूरंग इंगळे या ५३ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २७ जूनच्या पहाटे उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, मालेगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम तरोळी येथे जनार्धन इंगळे या इसमाने मद्य प्राशन करून आपणास जीव द्यायचा आहे, असे म्हटले होते. दारूच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या जनार्धनला त्याची चूलत बहिण लिलाबाई जोगदंड हिच्या घरी अंगणात झोपी घालण्यात आले. मात्र, २७ जूनच्या पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अंगणातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत जनार्धन इंगळेचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात मृतकाच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास मालेगाव पोलिस ठाण्याचे बीट जमादार संजय पिंपरकर करित आहेत. वाशिममध्ये युवकाची आत्महत्या!वाशिम : स्थानिक बसस्थानक परिसरात असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलमधील एका खोलीत गणेश अशोक वानखेडे (वय ३२ वर्षे, रा. गव्हा, ता. मानोरा) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी गणेशने ह्यसुसाईड नोटह्ण लिहून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, त्यामधे नेमका काय मजकूर लिहिलेला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
गळफास घेवून इसमाची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:28 IST
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील तरोळी येथील जनार्धन पांडूरंग इंगळे या ५३ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २७ जूनच्या पहाटे उघडकीस आली.
गळफास घेवून इसमाची आत्महत्या!
ठळक मुद्दे२७ जूनच्या पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अंगणातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत जनार्धन इंगळेचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.