शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मलिकांनी राखला वाशिमचा गड

By admin | Updated: October 20, 2014 01:11 IST

मलिक यांचा ४३९३ मतांनी विजय : दुस-या क्रमांकावर सेना, तिस-या क्रमांकावर काँग्रेस.

वाशिम : गत चार दिवसांपासून तमाम जिल्हावासीयांची उत्कंठा ताणून धरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि. १९) जाहीर झाला. यामध्ये वाशिम मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळविणार्‍या लखन मलिक यांनी तिसर्‍यांदा विजयश्री खेचून आणत भारतीय जनता पार्टीचा वाशिमचा गड कायम राखला. भाजपचे मलिक यांनी ४८ हजार १९६ मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा चार हजार ३९३ मतांनी पराभव केला. राज्यात आघाडी व युतीचा घटस्फोट झाल्यानंतर प्रथमच वाशिम मतदारसंघातून प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. तब्बल २६८ गावांचा समावेश असलेल्या वाशिम विधानसभा मतदारसंघात एकूण २0 उमेदवार रिंगणात होते. १५ ऑक्टोबर रोजी मतदारांनी २0 उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनमध्ये बंद केले होते. विधानसभेत पोहोचण्यासाठी झुंजणार्‍या या शिलेदारांच्या भाग्याचा फैसला १९ ऑक्टोबर रोजी झाला. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत लखन मलिक यांना १६२३, काँग्रेसचे सुरेश इंगळे यांना १३२९, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. दीपक ढोके यांना १४0२, तर शिवसेनेचे शशिकांत पेंढारकर यांना १२३४ मते मिळाली. शेवटच्या फेरीत मलिक यांनी यांनी ४८ हजार १९६ मते घेत प्रतिस्पर्धी शिवसेनेचे पेंढारकर यांचा चार हजार ३९३ मतांनी पराभव केला. शशिकांत पेंढारकर यांना ४३ हजार ८0३ मते मिळाली. काँग्रेसचे सुरेश इंगळे यांना ३५ हजार ९६८ मते घेत तिसर्‍या क्रमांकावर राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. दीपक ढोके यांना २१ हजार ६८0 मते मिळाली असून ते चौथ्या क्रमांकावर राहिले. भारिप-बहुजन महासंघाचे मिलिंद पखाले यांना १३ हजार २७६ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्‍वर जाधव यांना ११ हजार ४६३ मते मिळाली. बसपाचे राहुल भगत यांना २0६0, भाकपचे संजय मडवधरे यांना १८७७, अपक्ष डॉ. अलकाताई मकासरे यांना १४0६, महादेव ताटके यांना ९२५, रमेश अंभोरे यांना ४४0, शिवाजी इंगोले यांना ६४५, देवलाल बोर्डे यांना २४८, धाम वानखडे यांना २0४, नारायण पडघान यांना ४६२, परमेश्‍वर वाळवे यांना ४३0, भागवत रनबावळे यांना ७३६, रामचंद्र वानखेडे यांना ६९८, सुभाष देवहंस ६३१, संतोष खंदारे यांना ४८१ अशी मते मिळाली. सर्वांंत जास्त मते मिळवणारे भाजपचे मलिक यांना चार हजार ३९३ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.