शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या सभेकडे मालेगावकरांचे लक्ष

By admin | Updated: February 29, 2016 02:15 IST

आज नगरपंचायतची पहिली सर्वसाधारण सभेत तब्बल ४३ ठराव मांडणार.

मालेगाव : मालेगाव ग्रा.प.चे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. त्यामध्ये १७ सदस्य निवडून आले. नगरपंचायतीची पहिली मासिक सभा २९ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यामध्ये विकासाच्या दृष्टीने काय- काय ठराव पास होतात, याकडे समस्त जनतेचे लक्ष लागले आहे. मालेगाव ग्रा.प. यापूर्वी भाजपच्या ताब्यात होती. आता नगरपंचायत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ह्यनवा गडी नवा राजह्ण या उक्तीप्रमाणे शहरात आता विविध सुविधांच्या दृष्टिकोणातून पावले उचलल्या जाण्याची अपेक्षा आहे. नगरपंचायत पुढे गावातील स्वच्छता अभियान, रस्ते, वीज, पिण्याचे तसेच वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न, गावातील नाली बांधकाम, नाल्या दुरुस्ती, शहरातील वाढणारे अतिक्रमण, आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल देणे यासह मुख्य समस्या आहेत. अनेक प्रभागात महिनो महिने नाल्या काढल्या जात नाहीत. त्यामुळे शहरातील काही प्रभागात दुर्गंंधीचे वातावरण तयार झाल्याने डास निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रभागनिहाय नाली सफाई, जंतूनाशक औषधांच्या फवारणीचे नियोजन होणे आवश्यक आहे. शहराची ओळख स्वच्छ व सुंदर म्हणून होण्यासाठी १९ ही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन जागोजागी कचराकुंडी, कचरा नेण्यासाठी घंटागाडीची नियमित व्यवस्था करणे गरजेचे आहे. शहरात प्लास्टिक पिशवीवर बंदी आणून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जुन्या बसस्थानकावर प्रवाशी निवार्‍याअभावी प्रवाशांना हाल सोसावे लागत असू, प्रवासी निवारा तसेच स्वच्छतागृह जुन्या बसस्थानकासह शहरात विविध ठिकाणी उभारणे गरजेचे आहे. २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार्‍या सभेबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता तब्बल ४३ ठराव शहर विकासासाठी सभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये पाणीपुरवठा, शहरातील बोअरवेल दुरुस्ती, नगरपंचायत बांधकाम, नगरपंचायत रंगरंगोटी, घंटागाडी खरेदी, बोअरवेल अधिग्रहण करणे, नादुरुस्त मोटारी दुरुस्त करणे, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, ग्रा.प. व जि.प.च्या मालकीच्या जागा हस्तांतरित करणे, व नोंद करणे, सभापती कार्यालय फर्निचर केबीन तयार करणे, एलईडी लाइट खरेदी करणे, बांधकाम अर्जांंना परवानगी देणे, यासह अनेक ठराव सभेपुढे मांडण्यात येणार आहेत. याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.