शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:24 IST

मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात  राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देया आठवड्यात झालेल्या मालेगाव नगर पंचायतच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टिने मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात  राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या आठवड्यात झालेल्या मालेगाव नगर पंचायतच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीने सर्व राजकीय समिकरणे बदलून टाकली आहेत. सर्व राजकीय पक्षाचे नेते एका व्यासपीठावर आले असताना, त्यांच्याकडून शहरवासियांना शहराच्या विकासाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.गत निवडणुकीत मालेगाव नगर पंचायतवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मागील निवडणुकीची समीकरणे बदलत यावेळी काँग्रेस पक्षाला बाजूला सरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,, शिवसंग्राम आणि भारतीय जनता पार्टी हे सर्व सदस्य त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून एकत्र आल्याचे बोलले जात आहे.आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टिने मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते.राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पक्ष यांच्या संपर्कात असून लवकरच तो मोठा गट पक्ष प्र्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.मालेगाव तालुक्यात राजकारणाच्या बाबतीत वेगळीच परिस्थिती प्रत्येक वेळेस असते. याठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असतात तर खासदार भाजप असतात. तालुक्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तालुक्यातील अर्ध्याअधिक ग्रामपंचायती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मालेगाव नगरपंचायत अध्यक्षसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तालुक्यातील अनेक सेवा सहकारी सोसायट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुक्यात आपले राजकीय वजन ठेवून असताना, नेमके आता राष्ट्रवादी कॉग्रेसचा एक मोठा गटच अन्य पक्षांच्या संपर्कात असल्याने विविध चर्चेला ऊत आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असण्याबरोबरच, शिवसेनेचे वरिष्ठ नेते  तसेच भारिप-बमसंच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचालींना वेग आला असून तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवElectionनिवडणूक