शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

प्रधानमंत्री आवास योजनेत मालेगाव पंचायत समिती विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:25 IST

वाशिम - प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात मालेगाव पंचायत समिती प्रथम ठरली असून, मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गटविकास अधिकाºयांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देआॅगस्ट २०१८ अखेर अमरावती विभागात ६८.७० टक्के घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. मालेगाव पंचायत समितीने सर्वाधिक उद्दिष्टपूर्ती करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात मालेगाव पंचायत समिती प्रथम ठरली असून, मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत गटविकास अधिकाºयांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जातो. शासनातर्फे सन २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात जिल्हानिहाय घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार  अमरावती विभागात वाशिम जिल्हा ५ हजार ५६२, बुलडाणा जिल्हा १४ हजार ३१०, यवतमाळ जिल्हा १८ हजार ४३४, अमरावती जिल्हा ३४ हजार २८ आणि अकोला जिल्ह्यात १९ हजार ३१३ असे घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आॅगस्ट २०१८ अखेर अमरावती विभागात ६८.७० टक्के घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उद्दिष्टपूर्तीत उल्लेखनीय कामगिरी करणाºया पंचायत समित्यांचा गौरव मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचे (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक धनंजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समितीने सर्वाधिक उद्दिष्टपूर्ती करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते मालेगावचे गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी घरकुलांची उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून पंचायत समित्यांना ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखून दिला आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याने घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषदेची कामगिरी सरस ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव