शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बाजार समिती निवडणूक: घडामोडींना वेग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:45 IST

मालेगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्यानंतर, आता या पदासाठी २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देसभापती बबनराव चोपडे यांनी ६ जून रोजी तर उपसभापती प्रकाश अंभोरे यांनी ७ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता.आमदार अमित झनक व माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या सत्ताधारी गटाकडे स्पष्ट बहुमत आहे. सभापती व उपसभपती हे सहकार क्षेत्रात महत्त्वाचे पद मानल्या जात असल्याने घडामोडींना वेग आला आहे.

मालेगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्यानंतर, आता या पदासाठी २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. सभापती, उपसभापती पदी वर्णी लागावी  म्हणून राजकीय घडामोडींना वेग आला असून, यामध्ये कोण बाजी मारते याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे यांनी ६ जून रोजी तर उपसभापती प्रकाश अंभोरे यांनी ७ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता. सदर राजीनामे मंजूर झाल्याने रिक्त पदाकरिता २ जुलै रोजी निवडणूक  होणार आहे. आमदार अमित झनक व माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या सत्ताधारी गटाकडे स्पष्ट बहुमत आहे. यापूर्वी त्यांच्याच गटाचे सभापती व उपसभापती होते. त्यांच्या गटाकडे तेरा संचालक तर विरोधी गटात पाच संचालक आहेत. सत्ताधारी गटात रा.काँ. पक्षाचे पाच संचालक काँग्रेस पक्षाचे चार संचालक, शिवसेनाचे एक संचालक, व्यापारी वर्गातून दोन संचालक तर हमाल व मापारी गटातून एक संचालक आहेत तर विरोधी गटात माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक, आमदार विनायक मेटे समर्थक भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव समर्थक या सर्वांमिळून पाच संचालक आहेत. सभापती व उपसभपती हे सहकार क्षेत्रात महत्त्वाचे पद मानल्या जात असल्याने घडामोडींना वेग आला आहे. आमदार अमित झनक व माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव हे सभापती व उपसभापती पदासाठी कोणते नाव सूचवितात याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे  माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक गजानन देवळे, आमदार विनाकयराव मेटे, माजी आमदार विजयराव जाधव या दिग्गजांची कोणती रणनिती राहणार, सत्ताधारी गटातील काही संचालकांना आपल्या तंबूत आणू शकतात काय याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव