शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीचे काम करणाऱ्या मजुरांची तालुकानिहाय यादी तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST

वाशिम : कीटकनाशक, तणनाशके फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी सुरक्षा कीटचा वापर करणे आवश्यक आहे. फवारणीचे काम करणाऱ्या ...

वाशिम : कीटकनाशक, तणनाशके फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी सुरक्षा कीटचा वापर करणे आवश्यक आहे. फवारणीचे काम करणाऱ्या मजुरांची तालुकानिहाय यादी तयार करावी तसेच गावोगावी फवारणीविषयक जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात कीटकनाशक विषबाधाप्रकरणी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी आढावा सभेत बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याविषयीची माहिती स्थानिक कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी, फवारणी करणारे मजूर यांच्यापर्यंत पोहचवावी, असे त्यांनी सांगितले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, कीटकनाशक फवारणी करण्यापूर्वी तसेच फवारणी केल्यानंतर काय काळजी घेणे आवश्यक आहे, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रासायनिक खत, औषध विक्रेते, उत्पादक कंपन्या यांनी सुद्धा पुढाकार घेऊन जनजागृती करावी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनीदेखील यावेळी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली.

०००००००

अशी आहेत विषबाधेची लक्षणे

फवारणी करताना अशक्तपणा अथवा चक्कर आल्यासारखे वाटणे, त्वचेची व डोळ्यांची जळजळ होणे, डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, धाप लागणे किंवा छातीत दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित फवारणी बंद करावी व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी मार्गदर्शन केले.