शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

अपक्षांमुळे प्रमुख उमेदवारांचा ‘गोची’ !

By admin | Updated: October 6, 2014 00:53 IST

वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात बंडखोरीचे आव्हान.

संतोष वानखडे /वाशिमयुती, आघाडी दुभंगल्यानंतरही बंडोबांनी व काही तगड्या अपक्षांनी निवडणूक रिंगणात उडी मारून प्रमुख उमेदवारांच्या डोक्याचा ताप वाढविला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळी सर्वांचा अंदाज चुकविणारी असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाच्या गोटात चिंता वाढली आहे. जिल्हय़ात ५७ पैकी तब्बल २९ उमेदवार अपक्ष म्हणून टक्कर देत आहेत. यापैकी चार-पाच उमेदवार ह्यनिकालह्ण पलटविण्याची क्षमता राखून असल्याने राजकीय समीकरणही अनिश्‍चित बनत आहे.युती-आघाडीतील घटस्फोटाने राजकीय समीकरणं पार बदलून टाकले आहेत. युती-आघाडी दुभंगूनही संधी न मिळालेल्यांनी बंडखोरी केल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत. तर काहींनी पक्ष बदलून दुसराच झेंडा खांद्यावर घेतला आहे. परिणामी निवडणुकीत अधिकच चुरस आली आहे. काही ठिकाणी चौरंगी, तर काही मतदारसंघात बहुरंगी लढती होण्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे. वाशिम जिल्हय़ातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघातून एकूण ५७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. कारंजा व वाशिममध्ये प्रत्येकी ११ तर रिसोड मतदारसंघात सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. कारंजा व वाशिम मतदारसंघात प्रत्येकी दोन अपक्ष उमेदवार ताकद बाळगून असल्याने प्रमुख उमेदवारांची ह्यगोचीह्ण होत आहे.

** असे मतदारसंघ; असे अपक्षांचे उपद्रव्यमूल्य1) कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर तथा विद्यमान आमदार प्रकाश डहाके आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांची अपक्ष उमेदवारी राजकीय गणित बिघडविण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. दोन तगडे अपक्ष उमेदवार कशी फिल्डिंग लावतात, यावर येथील निवडणुकीचा ह्यनिकालह्ण अवलंबून राहणार आहे.2) वाशिम मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ. अलका मकासरे व राष्ट्रवादीचे बंडखोर महादेव ताटके यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीचे चित्र अस्पष्ट ठेवले आहे. दोन प्रमुख अपक्ष उमेदवार कुणाची मते खातात आणि कुणाला अडचणीत आणतात यावरून राजकीय गणित ठरणार आहे. 3)रिसोड मतदारसंघात बंडखोरी झाली नसली तरी मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ सानप यांच्या हातात सेनेने शिवधनुष्य देत राजकीय अंदाज चुकविले आहेत. येथे शेवटच्या क्षणी जातीचे समीकरण चालले नाही तर अनपेक्षित निकालही बाहेर येऊ शकतो.