शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच होणार महाराष्ट्र दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:42 IST

राज्यात १ मे रोजी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

लोकमत न्युज नेटवर्क     वाशिम :  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात १ मे रोजी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. त्यातील निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयातील केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे आणि यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून बॅण्डची व्यवस्था करण्याचे  किंवा शक्य न झाल्यास अधिकाºयांनीच राष्ट्रगिताचे गायन करण्याचे निर्देश २२ एप्रिल रोजी देण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यासाठीच लॉकडाऊन आणि संचारबंदीही लागू करण्यात आली असून, जनतेला सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्याशिवाय सर्व धार्मिक, राजकीय मेळावे, यात्रोत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. अशात शासकीय दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करणेही अयोग्य ठरू शकते. हे लक्षात घेऊनच राज्यशासनाने १ मे रोजी साजरा केला जाणारा महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश १५ एप्रिलच्या परिपत्रकानुसार दिले होते. आता २२ एप्रिल रोजी या संदर्भात आणखी एक परिपत्रक जारी करताना १५ एप्रिलच्या परिपत्रकातील सुचनेनुसारच राज्यातील केवळ जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयातच महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पोलीस विभागाशी समन्वय साधून पोलीस बॅण्ड उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे आणि बॅण्ड उपलब्ध नसल्यास कार्यक्रमात उपस्थित अधिकाºयांनीच राष्ट्रगिताचे गायन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.