शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 14:52 IST

वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीत महानेट प्रकल्प कार्यान्वित होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका वगळता अन्य पाच ठिकाणच्या तहसील कार्यालयांसह ३३६ ग्रामपंचायतींमध्ये उच्च क्षमतेची इंटरनेट जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी महा नेट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मात्र तांत्रीक स्वरूपातीली कामे सुरू होऊन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीत महानेट प्रकल्प कार्यान्वित होऊ शकली नाही.राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, ग्रामीण भागात कार्यान्वित ‘आपले सरकार सेवा केंद्र’, डिजिटल शाळा आदिंना सदोदित तथा गती असलेल्या इंटरनेटची सुविधा पुरविण्यासाठी ठराविक तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये माहिती तंत्रज्ञान महामंडळामार्फत महा नेट प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, कारंजा आणि रिसोड ही सहाही तहसील कार्यालये आणि त्यातील ४९१ ग्रामपंचायतींचा समावेश होता. दरम्यान, प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या पहिल्या टप्प्यात मंगरूळपीर तालुक्यातील कामे पूर्ण झाली असून मानोरा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसह अन्य चार तालुक्यांमधील तहसील कार्यालये आणि ३३६ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.याअंतर्गत ‘पॉर्इंट आॅफ प्रेझेन्स’ (पीओपी) स्थापित करण्यासाठी ‘नेटवर्क टर्मिनेशन डिव्हाईसेस’ आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्थापित केली जाणार असून त्यासाठी लागणारी पर्याप्त जागा, विद्यूतची पुरेशी सुविधा, इलेक्ट्रीक खांबांवरून टाकले जाणारे केबल्स आदी कामे केली जात आहेत; मात्र त्याची गती अगदीच संथ असून वर्षभरानंतर देखील एकाही ग्रामपंचायतीत हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये एका अध्यादेशानुसार वाशिम जिल्ह्यातील तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायत परिसरात महा नेट प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ठराविक पाच तहसील कार्यालये आणि जवळपास ३३६ ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक ठरू पाहणाऱ्या सुविधांबाबतचे जाळे उभारण्यात येत आहे. ही कामे सद्या गतीने केली जात असून लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- शेख जुनेदप्रकल्प व्यवस्थापक, महा नेट प्रकल्प, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत