शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची ’महा-ई-स्कॉल’ संगणक प्रणाली होणार बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१७-१८ या शैक्षणिक वषार्पासून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने विकसित केलेल्या महा-डीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती , शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, यापूर्वी राबविण्यात येणारी ’महा-ई-स्कॉल’ ही जूनी संगणक प्रणाली लवकरच बंद केली जाणार आहे. त्याअनुषंगाने ‘महा-ई-स्कॉल’या संगणक प्रणालीवर प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती व ...

ठळक मुद्देमहा-डीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान करण्याची कार्यवाही सुरू झाली. ‘महा-ई-स्कॉल’ ही जुनी संगणक प्रणाली येत्या काही दिवसात बंद होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सन २०१७-१८ या शैक्षणिक वषार्पासून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने विकसित केलेल्या महा-डीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, यापूर्वी राबविण्यात येणारी ’महा-ई-स्कॉल’ ही जूनी संगणक प्रणाली लवकरच बंद केली जाणार आहे. त्याअनुषंगाने ‘महा-ई-स्कॉल’या संगणक प्रणालीवर प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्कासंबंधीचे सर्व अर्ज तातडीने समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे आॅनलाईन सादर करणे आवश्यक आहे.मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदान करण्यासाठी ‘महा-डीबीटी’ नामक नवीन पोर्टल विकसित केले आहे. त्यामुळे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदान करण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘महा-ई-स्कॉल’ ही जुनी संगणक प्रणाली येत्या काही दिवसात बंद होणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली.‘महा-ई-स्कॉल’ या संगणक प्रणालीवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क संबंधीचे काही अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. सर्व प्रलंबित अर्ज तातडीने समाजकल्याण कार्यालयाकडे आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे तसेच त्या संबंधीचे ‘बी-स्टेटमेंट’, विद्यार्थ्यांचे अर्ज सर्व कागदपत्र व प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह समाजकल्याण विभागाकडे सादर करावी लागणार आहेत. अपूर्ण कागदपत्रांसह प्राप्त होणारे प्रस्ताव, कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेले प्रस्ताव मंजूर न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असा इशारा माया केदार यांनी दिला. नवीन महा-डीबीटी सन २०१८-१९ या शैक्षणिक वषार्पासून सुरू झाल्यानंतर कोणतेही जूने अर्ज प्रलंबित राहिल्यास त्यासाठी संबंधित संस्था, महाविद्यालय जबाबदार राहील, असे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले.

 

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती