वाशिम : यंदाच्या विधानसभा निवडणुकीने सर्वांचेच अंदाज चुकवित सत्तेची फळे चाखणार्यांवर आत्मचिंतनाची वेळ आणली आहे. जिल्ह्यात भाजपाचे कमळ दोन ठिकाणी फुलले असून पंजाचा हात कायमच आहे तर राकाँची घड्याळ बंद पडली. याऊलट भारिप- बमसंचा अकोला पॅटर्न वाशिम जिल्ह्यातही रुजत असल्यावर मताच्या आकडेवारीने शि क्कामोर्तब केले आहे. सेनेच्या धनुष्यबाणाचा निशाणा तिनही मतदारसंघात चुकला आहे तर मनसेचे इंजिन रुळावरच थांबले. आघाडी आणि युतीचा घटस्फोट झाल्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत नऊ लाख चार हजार ८८३ पैकी पाच लाख ५२ हजार २३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. जिल्ह्यातील कारंजा व वाशिम भाजपाच्या ताब्यात तर रिसोडवर काँग्रेसचा ताबा कायम राहिला. भाजपाला वाशिममधून ४८ हजार १९६, रिसोड ५४ हजार २३१ तर कारंजा मतदारसंघातून ४४ हजार ७५१ अशी एकूण एक लाख ४४ हजार १७८ मतदारांनी पसंती दिली आहे. काँग्रेसला वाशिममधून ३५९३८, कारंजा ३0१0 तर रिसोडमधून ७0९३९ अशी एकूण एक लाख नऊ हजार ९१७ मतदान झाले आहे. साधारणत: काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असायचा. मात्र, विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील भारिप-बमसं पॅटर्नच्या झंझावाताने इतर पक्षांना मागे टाकून वाशिम जिल्ह्यातही तिसर्या क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच सतर्कतेचा इशारा दिला आहे. चवथ्या क्रमांकाची मते शिवसेनेला मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाला मतदारांनी पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला शेवटच्या क्रमांकावर आली आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाचे अधिकाधिक वर्चस्व आहे. त्याखालोखाल शिवसेना, भार तीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा क्रमांक लागतो. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असल्या तरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मोदी लाटेपुढे म ताधिक्क टिकविणेही शक्य झाले नाही.
कमळ फुलले, पंजा कायम तर घड्याळ बंद
By admin | Updated: October 23, 2014 00:58 IST