वाशिम : हिंगोली जिल्हय़ातील बारंबा येथील एका व्यक्तीची सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने असलेली आणि रेल्वेत हरवलेली बॅग वाशिम येथील रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने सापडली. २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आला असून, ही बॅग संबंधित प्रवाशास परत करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हय़ातील बारंबा येथील विष्णू शिवाजी पवार हे पूर्णा-अकोला पॅसेंजरने सकाळी सात वाजता हिंगोली येथे जाण्यासाठी निघाले होते. हिंगोली रेल्वेस्थानकावर स्वत:कडील बॅग न घेता ते तसेच स्थानकावर खाली उतरले. दरम्यान, आपली बॅग रेल्वेतच राहून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लगेच हिंगोली येथील स्टेशन मास्तरशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. दरम्यान, हिंगोली रेल्वे पोलिसांनी ही माहिती वाशिम येथील रेल्वे पोलिसांना दिली. पूर्णा-अकोला पॅसेंजर वाशिमला पोहोचताच रेल्वे पोलीस जमादार संजय सुरवाडे, रेल्वे पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी ही बॅग विष्णू पवार यांना त्यांची ओळख पटल्यानंतर परत केली.
दागिन्यांची हरवलेली बॅग सापडली
By admin | Updated: June 29, 2015 01:18 IST