शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

देयकासोबत रॉयल्टीच्या पावत्या जोडण्यास ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:06 IST

गौण खनिजाच्या पावत्या आढळून न आल्याने आठ महिन्यांपूर्वी वाशिम तहसीलदारांनी ठोठावलेला दंड अद्यापही बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारांकडून वसूल केला नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांनी ठोठावलेल्या दंडाची अद्याप वसुलीच नाही शासकीय बांधकामांवर गौण खनिजाची तपासणी 

संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासकीय इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देयकासोबत गौण खनिजाच्या रॉयल्टी पावत्या जोडण्याची बाब कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग फारसा गांभीर्याने घेत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. गौण खनिजाच्या पावत्या आढळून न आल्याने आठ महिन्यांपूर्वी वाशिम तहसीलदारांनी ठोठावलेला दंड अद्यापही बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारांकडून वसूल केला नसल्याची माहिती आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम केले जाते. निविदा प्रक्रियेतून बांधकामाचे कंत्राट मिळाल्यानंतर, संबंधित कंत्राटदारांकडून बांधकाम करताना रेती, गिट्टी, मुरूम, दगड आदी गौण खनिजांचा वापर करण्यात येतो. गौण खनिजाचा वापर करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराने रॉयल्टीची (स्वामित्व धन)  रक्कम महसूल प्रशासनाकडे जमा करणे अपेक्षित आहे. शासकीय बांधकामांवर अवैध गौण खनिजाचा वापर झाल्यास शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लागू शकतो, ही बाब लक्षात घेऊन महसूल प्रशासनातर्फे शासकीय बांधकामांवर अचानक भेटी देऊन रॉयल्टी पावत्यांची तपासणी केली जाते. दुसरीकडे संबंधित कंत्राटदाराने देयकासोबत रॉयल्टीच्या पावत्या जोडणे बंधनकारक आहे.देयकासोबत रॉयल्टीच्या पावत्या सादर न केल्यास बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारांचे देयक अदा करू नये, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) मध्ये दिलेल्या आहेत. तथापि, या नियमाला धाब्यावर बसवून कंत्राटदारांची देयके अदा केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून वाशिम तहसीलदारांनी  आठ महिन्यांपूर्वी वाशिम शहरात सुरू असलेल्या शासकीय बांधकामांना भेटी देत रॉयल्टीच्या पावत्यांबाबत तपासणी केली होती. यावेळी जवळपास २१ ठिकाणी गौण खनिजाच्या रॉयल्टी पावत्या आढळून आल्या नाहीत तसेच काही पावत्यांची तपासणी जिल्हा खनिकर्म विभागाकडून संबंधितांनी केली नव्हती, ही बाबही निदर्शनात आली होती. याप्रकरणी १९ जणांना ३३ लाख ११ हजारांचा दंडही ठोठावला होता. सदर दंडाची रक्कम संबंधित कंत्राटदारांकडून वसूल करून तहसीलदार वाशिम यांचे नावे धनादेशद्वारे जमा करण्याच्या सूचना देतानाच, दंडाची रक्कम वसूल केल्याशिवाय संबंधित कंत्राटदारांचे पुढील देयक अदा करू नये, असा इशारा दिला होता. आठ महिने लोटल्यानंतरही बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारांकडून दंडाची रक्कम वसूल केली नाही. दुसरीकडे काही कंत्राटदारांची पुढील देयके अदा केल्याची माहिती हाती येत आहे. खनिकर्म विभागाच्या ‘महसूल’ला शासनाच्याच दुसर्‍या विभागाकडून कसा चुना लावतो जातो, याचा उत्तम नमुना या प्रकरणातून समोर आला आहे. 

काही कंत्राटदारांवर राजकीय वरदहस्त ..गौण खनिजाच्या रॉयल्टी पावत्या आढळून न आल्याने संबंधित कंत्राटदारांविरुद्ध ३३ लाखांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये वाशिम शहरासह अन्य जिल्हय़ातील नामवंत कंत्राटदारांचा समावेश आहे. राजकीय क्षेत्रातील काही ‘वजनदार’ नेत्यांचा काही कंत्राटदारांवर वरदहस्त असल्याने दंडाची रक्कम वसूल होईल की नाही, याबाबत साशंकता वर्तविली जात आहे. 

शासकीय बांधकामांवर तपासणी होणार ..सध्या वाशिम शहर परिसरात सहा ते सात शासकीय कार्यालय इमारतींचे बांधकाम सुरू असून, तेथे मोठय़ा प्रमाणात गौण खनिजाचा वापर होत आहे. सदर गौण खनिजाच्या रॉयल्टी पावत्यांची तपासणी मोहीम लवकरच हाती घेतली जाणार आहे, अशी विश्‍वसनीय माहिती आहे. 

शासकीय बांधकामाच्या ठिकाणी पाहणी केली असता, काही जणांकडे गौण खनिजाच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध प्रकरण दंडनिहाय करण्यात आले आहे. अद्याप दंडाची रक्कम तहसीलच्या नावे जमा झालेली नाही. दंडाची रक्कम वसूल केल्याशिवाय संबंधित कंत्राटदारांचे पुढील देयक अदा करू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत.-बळवंत अरखराव, तहसीलदार वाशिम

महसूल विभागाच्या सूचनेनुसार कंत्राटदार आता देयकासोबत गौण खनिजाच्या रॉयल्टी पावत्या जोडत आहेत. रॉयल्टीच्या पावत्या आल्यानंतर पडताळणीसाठी महसूल विभागाकडे पाठविल्या जातात. संबंधित कंत्राटदारांकडून दंडाची रक्कम वसूल करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. तथापि, ज्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली, त्यांची पुढील देयके बांधकाम विभागाकडे आली असतील तर त्या लेखाशीर्षाला (हेड) पैसे आले किंवा नाही, याची माहिती घेतली जाईल. लेखाशीर्षाला पैसे आले असतील, तर संबंधित कंत्राटदारांकडून दंडाची रक्कम कपात करून संबंधित यंत्रणेकडे जमा करण्यासंदर्भातची कार्यवाही केली जाईल. देयकासोबत गौण खनिजाच्या रॉयल्टीच्या पावत्या जोडल्या की नाही, याची शहानिशा केली जात आहे.- के. आर. गाडेकरकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम.