शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : निवडणुक चार दिवसांवर; नाराजी नाट्य चव्हाट्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:15 IST

वाशिम : लोकसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रमुख राजकीय पक्षातील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे.

- सुनील काकडे वाशिम : लोकसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रमुख राजकीय पक्षातील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे. ठराविक गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही पक्षात विशेष सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून अंतर्गत वाद धुमसत असून त्याचा मोठा फटका थेट उमेदवारांना बसण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.शिवसेनेच्या विद्यमान उमेदवार भावना गवळी यांच्या पाठीशी स्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा जत्था असण्यासोबतच मित्रपक्ष असलेल्या भाजपामधील स्थानिक नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही पाठबळ असायला हवे होते. प्रत्यक्षात मात्र यंदाची परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे. कारंजा-मानोरा आणि वाशिम-मंगरूळपीर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील काही नाराज पदाधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीने आघाडी उघडली आहे. हा विरोधी गट तुलनेने प्रभावी असून भावना गवळींची हक्काची मते घटविण्यात मोठी भुमिका पार पाडू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजपा या मित्रपक्षातील स्थानिक नेतेमंडळी ‘आम्ही सोबतच’च्या वल्गना करित असले तरी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भावना गवळींनाही भाजपातील बहुतांश प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यात अद्याप यश आलेले नाही.मंगरूळपीर येथे शनिवार, ६ एप्रिल रोजी शिवसेनेच्या एका पदाधिकाºयाने ‘चौकीदारही चोर है’ची घोषणा दिल्यानंतर भाजपाकडून त्यास मिळालेल्या तिखट प्रतिसादावरून ही बाब स्पष्टपणे अधोरेखीत झाली त्यामुळे निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असताना स्वपक्षासोबतच मित्रपक्षात पसरलेली ही नाराजी दूर करण्याचे आव्हान भावना गवळी यांचे समोर आहे.

काँग्रेसमध्येही रंगतेय मानापमान नाट्य!वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरलेले माणिकराव ठाकरे यांना विजयी करण्यासाठी स्वपक्षासोबतच प्रमुख मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी प्रयत्नरत दिसत असले तरी गटातटात विखुरलेल्या काही स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षात सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून नाराजीचा सूर उमटत आहे. राष्ट्रवादीतही अनेक गट पडले असून त्यांना एकत्र आणण्यात ठाकरेंना सद्यातरी यश मिळालेले नाही. यामुळे उघडपणे नव्हे; परंतु छुप्या पद्धतीने सुरू असलेला हा विरोध ठाकरे यांना अडचणीचा ठरू शकतो असा अंदाज राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

पवारांसह आडे आणि येडे यांच्याकडेही मतदारांचे लक्ष!लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमाविण्यासाठी उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रविण पवार, बंडखोर पी.बी. आडे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वैशाली येडे या तीन उमेदवारांचा प्रचारही सद्या तेजीत असून ते नेमकी कोणाची मते खाणार याकडे वाशिम व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक