शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी ३७ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:41 IST

वाशिम : यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला १८ मार्चपासून सुरूवात झाली असून, नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३७ उमेदवारांनी नामांकन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला १८ मार्चपासून सुरूवात झाली असून, नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३७ उमेदवारांनी नामांकन सादर केले. शेवटच्या दिवशी २५ मार्च रोजी २६ उमेदवारांनी नामांकन सादर केले.लोकसभा निवडणुकीसाठी नामाकंनाचा पहिला दिवस अपक्षांनी गाजविला. पहिल्याच दिवशी दोघांनी उमेदवारी दाखल करून मुहूर्त साधला होता.यवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यात असल्याने अपक्षांनी आपली तयारी सुरू केल्याचे दिसून आले. वेळेवर धावपळ नको म्हणून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजूळव इच्छकांकडून केली गेलीे. प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पहिल्या दिवशी नामाकंन अर्ज घेतले, यासोबत अपक्ष व विविध आघाडीतील उमेदवारांच्या प्रतिनिधीकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आले .पहिल्या दिवशी एकूण २२ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले परंतु त्यातील दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भारतीय बहुजन आघाडीच्यावतिने रमेश गोरसिंग पवार तसेच जनता दल (से)तर्फे सुनील नटराजन नायर यांनी अर्ज दाखल केला होता.दुसऱ्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नाही. परंतु १२ इच्छूक उमेदवारांनी अर्जाची उचल करण्यात आली होती. तिसऱ्या दिवशी २० मार्च रोजी दोन उमेदवारांनी नामांकन दाखल केले यामध्ये अंकित मोहन चांडक आणि समीर अरुण देशपांडे या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. चौथ्या दिवशी रंगपंचमीची सुटी असल्याने पाचव्या दिवशी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये संदीप अनंतराव देवकते, रशीद खान हमीद खान, संतोष बाबुसिंग जाधव, अनिल जयराम राठोड, शेख जावेद शेख मुश्ताफ, शहेजाद समिउल्ला खान या सर्वांनी अपक्ष तर राष्टÑीय बहुजन काँग्रेस पार्टीच्यावतिने पुरूषोत्तम डोमाजी भजगवरे यांचा समावेश आहे.सहाव्या व सातव्या दिवशी सुटी आल्याने कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाही. परंतु शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांसह २६ उमेदवारांनी नामांकन सादर केलेत. निवडणुकीसाठी अर्ज सादर करणाऱ्यांपैकी माघार कोण घेईल ते २८ मार्च रोजी दिसून येईल व यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.१८.९० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्कवाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी वाशिम व कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात तर रिसोड विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १२ लाख ५५ हजार २८३ आणि वाशिम जिल्ह्यातील ६ लाख ३५ हजार ५४६ असे एकूण १८ लाख ९० हजार ८२९ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक