शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:27 IST

वाशिम : कुंभार समाजातील व्यक्तीला विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यासाठी दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीकरीता स्वामित्वधन माफ केलेले आहे.

वाशिम : कुंभार समाजातील व्यक्तीला विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यासाठी दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीकरीता स्वामित्वधन माफ केलेले आहे. या निर्णयाची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी तहसिलस्तरावर कुंभार समाजातील परंपरात व्यवसाय करणाºया व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करण्याच्या सूचना महसूल विभागाने २१ जानेवारीला राज्यातील जिल्हाधिकाºयांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अंमलबजावणी केली जाणार आहे.शासनाने कुंभार समाजाच्या व्यक्तींना विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यास दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीसाठी स्वामित्वधन माफ केलेले आहे. तरीही कुंभार समाजाच्या व्यक्तीकडे स्वामित्वधन भरण्यासाठी क्षेत्रीय अधिकाºयांकडून आग्रह धरला जातो, अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. ५०० ब्रासपर्यंत मोफत माती देण्याच्या निर्णयासंदर्भात संपूर्ण राज्यात एकसुत्रता यावी याकरीता शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेतील पदाधिकाºयांनी शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने महसूल विभागाने २१ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना सूचना देत कुंभार समाजातील पात्र व्यक्तींना ५०० ब्रासपर्यंत माती देण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजाावणी करावी, अशा सूचना दिल्या. प्रत्येक तहसिलदाराने तलाठी व मंडळ अधिकाºयांमार्फत सर्वेक्षण करून परंपरागत कुंभार व्यवसाय करणाºया कुंभार समाजातील व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करावी. सदर यादी तयार करताना जातीचे दाखले असलेल्या व्यक्तींची व जातीचे दाखले नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करावी. तालुक्यातील पिढीजात व्यवसाय करणाºया कुंभार समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत, अशा व्यक्तींना जातीचे दाखले देण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र शिबिर आयोजित करून सक्षम प्राधिकाºयांकडून जातीचे दाखले देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना महसूल विभागाने दिलेल्या आहेत. संबंधित लाभार्थीला अर्जासोबत जातीचा दाखला, तलाठी व मंडळ अधिकारी यांचा सदर व्यक्ती पारंपारिक कुंभार समाजाचा व्यवसाय करीत असल्याचा अहवाल आदी कागदपत्रे तहसिल कार्यालयास सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर ५०० ब्रासपर्यंत माती देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.कुंभार समाजातील व्यक्तीला विटा, कौले किंवा इतर वस्तू तयार करण्यासाठी दरवर्षी ५०० ब्रासपर्यंत मातीकरीता स्वामित्वधन माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून वाशिम जिल्ह्यात शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- दीपक कुमार मीनाप्रभारी जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम