शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

५९ वर्षांत लिंगा ग्रामपंचायत पहिल्यांदाच अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:45 IST

रिसोड (वाशिम): तालुक्यातील लिंगा (कोतवाल)या ग्रामपंचायतच्या स्थापनेनंतर गेल्या ५९ वर्षांत येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच अविरोध करण्यात आली. यात सरपंचासह सर्वच सदस्यांची मंगळवारी अविरोध  निवड करण्यात आली. ग्रामपंचायत पहिल्यांदाच अविरोध सरपंच व सदस्यांची निवड झाल्यामुळे पंचक्रोशीत गावकºयांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे. 

ठळक मुद्देसामंजस्याने निर्णयज्येष्ठ नागरिकांसह महिला व युवकांचा पुढाकार

लोेकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): तालुक्यातील लिंगा (कोतवाल)या ग्रामपंचायतच्या स्थापनेनंतर गेल्या ५९ वर्षांत येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच अविरोध करण्यात आली. यात सरपंचासह सर्वच सदस्यांची मंगळवारी अविरोध  निवड करण्यात आली. ग्रामपंचायत पहिल्यांदाच अविरोध सरपंच व सदस्यांची निवड झाल्यामुळे पंचक्रोशीत गावकºयांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे. ग्राम पंचायत निवडणूक म्हटली की,  राजकीय मतभेदातून निर्माण होणारे वाद, तंटे, भाऊबंदकीत वाढत चाललेला व्देष  हा नित्याचाच भाग होऊन बसला. यामुळे गावातील व पिडीत कुटूंबातील वाद टोकाला गेल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. या वादामधून अनेकवेळा दोन गटात तुंबळ हाणामाºया सुध्दा होत असतात. परिणामी शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असा प्रकार आपल्या गावात होऊ नये यासाठी लिंगा (कोतवाल) या छोट्याशा गावातील सर्व  धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गावातील निवडणूक अविरोध करण्याचा मानस केला. निवडणूक अविरोध करण्यासाठी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, महिला, तरूण वर्ग व भजनी मंडळींनी पुढाकार घेऊन सरपंच व सदस्यांची निवड केली. या निवडप्रक्रियेमध्ये सर्व धर्मातील नागरिकांना समसमान न्याय दिल्या गेला. यामुळे घोषीत केलेले सरपंच व सदस्य पद हे अविरोध निवडून आले. यामध्ये सरपंचपदी शांताबाई माधवराव देशमुख, सदस्यपदी संगिताताई सुधाकरराव देशमुख, अनिता संजय देशमुख, ज्ञानेश्वर तुकारामजी देशमुख, निलेश रमेशराव देशमुख, शारदा रतन डोंगरे, भिका रामजी डोंगरे, पार्वती धनंजय डोंगरे यांचा समावेश असल्याची माहिती तहसिलदार राजू सुरडकर यांनी दिली