शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
5
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
6
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
7
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
8
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
9
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
10
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
11
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
12
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
13
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
14
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
15
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
16
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
17
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
18
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
19
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
20
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज

लिंगायत समाजाचा २८ जानेवारीला  यवतमाळ येथे महामोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:33 PM

वाशिम: लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या मागणीसाठी रविवार, २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत समाजबांधवांच्या विराट विदर्भस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे धर्माला स्वतंत्र मान्यता, अल्पसंख्याक दर्जा मागणीसाठी यवतमाळ येथे महामोर्चाचे आयोजन.सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

वाशिम: लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या मागणीसाठी रविवार, २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत समाजबांधवांच्या विराट विदर्भस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, भालकी मठाचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, कोरणेश्‍वर आप्पा महास्वामीजी, बसवब्रिगेडचे संस्थापक अ‍ॅड. अविनाश भोसीकर करतील. याबाबत समन्वय समितीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, भारतीय संविधानाच्या कलम २५ व २९ नुसार आपली संस्कृती जपण्याचा अधिकार सर्वांना आहे. शासनाने लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता दिल्यास भावी पिढीला शैक्षणिक लाभ मिळतील. विद्यार्र्थ्यांना वेगळी शिष्यवृत्ती, वेगळे वसतीगृह, मोफत कोचिंग, रोजगारभिमुख प्रशिक्षण, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, गॅझेटेड पोस्टसाठी ५० हजाराची मदत, राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना, बिजभांडवल योजना आदी लाभ मिळतील. तसेच मेडीकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज, विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालये, हायस्कुल, प्राथमिक शाळा किंवा स्वतंत्र विद्यापीठ नव्याने सुरु करण्याची परवानगी अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून मिळू शकेल. तसेच लिंगायत धर्माचे मठ, मंदिरे यांना कुळकायदा लावून ते कुणी बळकावू शकणार नाही. पाठ्यक्रमात लिंगायत संस्कृतीचा समावेश होईल. हे लाभ प्राप्त होण्यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मान्यतेची गरज असून या मागणीसाठी यवतमाळ येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्व लिंगायत, गवळी, बुरुड, तेली, माळी, देवांग, कोष्टी, वाणी, जंगम आणि इतर लिंगायत समाजातील व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, कर्मचारी, प्राध्यापक डॉक्टर, इंजिनिअर, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थीनी, सामाजीक संघटना, संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमYavatmalयवतमाळ