शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

त्याग वृत्तीमुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी -मुनीश्री श्री पद्मदर्शन विजयजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:55 IST

प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) : गरजु गोरगरीबांची सेवा करुन त्यांना नेहमी मदत केली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या व गरजवंतांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवुन त्यांची सेवा करणे हा खरा धर्म आहे. प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.शिरपूर येथील पारसबाग येथे दिव्यप्रभावी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने आयोजित चातुर्मासनिमित्त वाराणसी नगरीत ऐतिहासिक ५० दिवसीय चातुर्मास आराधना सुरू आहे. या धार्मिक सोहळयात मोठ्या संख्येत विविध राज्यातून ७०० भाविकांनी सहभाग घेतला आहे. याप्रसंगी पन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून ज्ञानगंगा वाहत आहे. यावेळी मुनिश्रींनी आपल्या उपदेशात त्यागवाद श्रेष्ठ आहे असे म्हटले. त्याग नसेल तर जीवनात अर्थ नाही. त्याग नसणाऱ्याचे जीवन पशुतुल्य असते. जीवनात अनेकदा अशा घटना घडतात की त्यावेळी मनुष्याला काय करावे व काय करु नये, अशी परिस्थीती निर्माण होते. जीवन एक संग्राम भूमि सारखे आहे. जीवनाच्या या संग्राम भूमिवर आपल्याला यशस्वी व्हावयाचे असल्यास त्यागाच्या मार्गावर चालने शिका. लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, भगवान महावीर, प्रभु रामचंद्र, युधीष्ठीर आदींच्या जीवनाचा आदर्श अंगिकारल्यास निश्चितच दुस-यांसाठी आपले जीवन प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या प्रवचनातून पुढे बोलताना मुनीश्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी आपल्या जवळ जास्त असणारे धन, सामान हे गरजवंत व गरिबांना द्या, त्यांना मदत करा, मंदिर, धर्मस्थान, धार्मिक स्थळ ठिकाण आदी ठिकाणी दानधर्र्म करण्याऐवजी जर आपण दीनदु:खी गोरगरीबांना सहाय्यता केली तर ते मोठे धर्म व पुण्याचे काम राहणार आहे. कारण दुस-याच्या प्रति सहानुभुती व मदतीची भावना ठेवणे हाच खरा मानव धर्म आहे, असे विजयजी महाराज म्हणाले. कार्यक्रमाला भाविकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र