शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

कर्मचाऱ्यांना ‘व्यवस्थापना’चे धडे !

By admin | Updated: April 27, 2017 00:24 IST

वाशिम : जिल्ह्यातील आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण २५ एप्रिल रोजी तहसीलस्तरावर घेण्यात आले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा : प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षणवाशिम : जिल्ह्यातील आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण २५ एप्रिल रोजी तहसीलस्तरावर घेण्यात आले.जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, तहसील कार्याल्य व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी २४ तास तयार असायला हवे, प्रत्येक सजीवाचा जीव वाचवणे आपले कर्तव्य आहे. नियंत्रण कक्षात काम करतांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून माहिती कशी घ्यावी, अहवाल कसा तयार करावा, वरिष्ठ कार्यालयास अहवाल कसा सादर करावा, नियंत्रण कक्षाचे स्वरुप कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. यशदाचे प्रकल्प अधिकारी डॉ.सतिष पाटील यांनी नियंत्रण कक्ष कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व भूमिका सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापन चक्र, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व त्याची कलमे विस्तृतपणे सांगितले. यशदाचे मानद व्याख्याते विवेक नायडु पुढे म्हणल की, आपत्ती व्यवस्थापनाचे विविध टप्पे व प्रकार काय आहेत हे समजुन घ्यावे. त्यानुसार आपल्या भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडाव्या तसेच कोणत्याही संकटात तथा आपत्तीमध्ये मानवता धर्मानुसार व कायद्यानुसार विविध आपत्तीच्या काळात मनात कुठलीही भिती न ठेवता कार्य करावे असे विचार मांडले. शासकीय कर्मचाऱ्यांना यावेळी शोध व बचाव, दोरीच्या गाठीेचे प्रकार, स्ट्रेचर, बँडेजचे प्रकार, प्रथमोपचार प्रात्यक्षीकांच्या माध्यमातून यशदाचे व्याख्याते ओंकार नवलीहाळकर यांनी करुन घेतले. सर्व तहसील कार्यालयात योगेश परदेशी, अक्षय चव्हाण, राहूल पोखरकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व प्रात्यक्षीकांच्या माध्यमातुन प्रशिक्षण दिले. सदरील कार्यक्रम जिल्हयातील वाशिम, मालेगाव , रिसोड, मंगरुळपीर, मानोरा ,कारंजा येथे तहसील कार्यालयातील सभागृहात घेण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरीय तहसील कर्मचारी व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकातील माधव गोरे, शिवाजी जावळे, विशाल हिंगमिरे, अशांत कोकाटे यांनी प्रयत्न केले. --