शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानांवर तूरडाळ विक्रीला अल्प प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 18:45 IST

शिधापत्रिकाधारकांकडून तूरडाळ खरेदीला अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने दुकानदार जोखीम न पत्करता मागणीचा विचार करूनच तूरडाळीची उचल करीत आहेत.

ठळक मुद्दे स्वस्तधान्य दुकानदारांना पुरवठा विभागामार्फत प्रति १ किलोच्या पाकिटातून मागणीनुसार तूर पुरविली जात असून, यात घट येण्याचीही शक्यता नाही.स्वस्तधान्य दुकानांत तूरडाळ शिजण्यास अवघड असून, चवीलाही चांगली नसल्याचे शिधापत्रिकाधारकांचे मत आहे.

वाशिम: शासनाच्या विविध योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई करून ती स्वस्तधान्य दुकानांतील तूरडाळ विक्रीला प्रतिसाद वाढावा म्हणून शासनाने स्वस्तधान्य दुकानदारांचे कमीशन वाढविले असले तरी, शिधापत्रिकाधारकांकडून तूरडाळ खरेदीला अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने दुकानदार जोखीम न पत्करता मागणीचा विचार करूनच तूरडाळीची उचल करीत आहेत.राज्य शासनाने गत तीन वर्षांत शासकीय योजनेंतर्गत लाखो मेट्रिक टन तूर खरेदी केली; परंतु बाजारात तुरीचे भाव पडल्याने ही तूर विकणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे शासकीय योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून निघणारी तूरडाळ स्वस्तधान्य दुकानांमधून विकण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, शासनाकडून या डाळ विक्रीसाठीही इतर धान्याप्रमाणेच स्वस्तधान्य दुकानदारांना ७० पैसे ते १.५० रुपयापर्यंत प्रतिकिलो कमीशन देण्यात येत होते. त्यामुळे या तूरडाळ विक्रीला प्रतिसाद मिळेनासा झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तूरडाळ विक्री वाढविण्यासाठी स्वस्तधान्य दुकानदारांचे कमीशन दुप्पट केले. या निर्णयानुसार पॉस मशीनवर तूरडाळ विकणाºया दुकानदारांना १.५० रुपयांवरून ३.०० रुपये, तर पॉस मशीनविना तूर विकणाºया दुकानदारांना १.५० पैसे कमीशन देण्यात येत आहे. स्वस्तधान्य दुकानदारांना पुरवठा विभागामार्फत प्रति १ किलोच्या पाकिटातून मागणीनुसार तूर पुरविली जात असून, यात घट येण्याचीही शक्यता नाही. तथापि, शिधापत्रिकाधारकांचा या तूरडाळ खरेदीस अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने स्वस्तधान्य दुकानदार जोखीम न पत्करता मोजक्याच तूर डाळीची उचल पुरवठा विभागाकडून करीत आहेत. त्यामुळे स्वस्तधान्य दुकानदारांचे कमीशन वाढवूनही तूरडाळ विक्रीचे प्रमाण मात्र वाढलेच नसल्याचे स्पष्ट होत आहे.  डाळीचा दर्जा व दराचा परिणामस्वस्तधान्य दुकानांत शासनाकडून भरडाई केलेली विकल्या जात असलेली तूरडाळ शिजण्यास अवघड असून, चवीलाही चांगली नसल्याचे शिधापत्रिकाधारकांचे मत आहे. त्यामुळे आधीच या तूरडाळ खरेदीबाबत शिधापत्रिकाधारक अनुत्साही आहेत. त्यातच बाजारात मिळणाºया तुरडाळीचे दर आणि स्वस्तधान्य दुकानांत विकल्या जाणाºया तुरडाळीच्या दरात दर्जाचा विचार करता फारसा फरक नसल्याने शिधापत्रिकाधारक स्वस्तधान्य दुकानांत मिळणारी डाळ घेण्यात उत्साही नसल्याचे दिसत आहे.  

शासनाकडून भरडाई केलेली तूरडाळ आम्ही स्वस्तधान्य दुकानांत विकत आहोत. यामध्ये घट येत नसल्याने आमचे नुकसानही नाही; परंतु ही तूरडाळ शिजत नसल्याचे काहींचे मत आहे. आम्ही मागणीचा विचार करूनच या तुरडाळीची उचल करून ती विकत आहोत. -तानाजीराव काळे,जिल्हाध्यक्ष, स्वस्तधान्य दुकानदार संघ

टॅग्स :washimवाशिम