शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना घरासाठी मिळणार अनुदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:42 IST

वाशिम : अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधकामासाठी १.५० लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना कामगार विभागाने १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.

वाशिम : अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधकामासाठी १.५० लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना कामगार विभागाने १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या घराच्या विभागाने १४ जानेवारीला मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून १.५० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. याकरिता संबंधीत पात्र कामगाराकडे कि मान २६९ चौ.फुट इतकी जागा असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगाराने यापुर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, घरकुलामध्ये स्वयंपाकगृह,बैठक हॉल, याबरोबरच स्रानगृह व शौचालय असणे आवश्यक आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणुन अपर कामगार आयुक्त किंवा कामगार उपायुक्त राहणार आहेत. सदस्य म्हणुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक,कामगार, कल्याणकारी मंंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. नोंदणीकृत बांधकाम, कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी किंवा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. या योजनेच्या संनियंत्रणासाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठीत केली जाणार आहे.

शासन निर्णयानुसार या योजनेचे वाशिम जिल्ह्यात सनियंत्रण केले जाईल.दीपक कुमार मीना,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना