शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे  शेतकरी व तरुणांसाठी चर्मोद्योग प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:56 IST

वाशिम : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या सर्व प्रवर्गातील शेतकरी, तरुणांसाठी उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज येथे दोन महिन्यांचे (डिसेंबर ते जानेवारी) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील फुरसतगंज येथे दोन महिन्यांचे प्रशिक्षण

वाशिम : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या सर्व प्रवर्गातील शेतकरी, तरुणांसाठी उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज येथे दोन महिन्यांचे (डिसेंबर ते जानेवारी) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन कटिंग आॅपरेटर-फुटवेअर, सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन क्लोजिंग आॅपरेटर-फुटवेअर या प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (लिडकॉम)चे जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

सदर प्रशिक्षणासाठी १८ ते ३५ वर्षे वयोगटातील, किमान ८ वी पास युवक अर्ज करू शकतात. अजार्सोबत जातीचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, फोटो जोडणे आवश्यक आहे.  १५ व १६ नोव्हेंबर २०१७ रोजी विहित नमुन्यातील अर्ज संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथील जिल्हा कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. विहित नमुन्यातील अर्ज याच कार्यालयात उपलब्ध आहेत.  १६ नोव्हेंबर २०१७ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी  १७ ते १८ नोव्हेंबर २०१७ रोजी होणार आहे. तसेच  २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे लिडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे