शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 18:00 IST

सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान : २८ जेसीबी मशिन उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व ...

सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान : २८ जेसीबी मशिन उपलब्धलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार भारतीय जैन संघटनेमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम वाशिम अभियानांतर्गत १४ नोव्हेंबरला जलसंधारणाच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. ‘बीजेएस’ने पाच तालुक्यातील कामांसाठी सध्या २८ जेसीबी मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील काही वर्षापासून राज्याला मोठया प्रमाणात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार व पाणी फांउडेशनच्या कामांमधून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. आता जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा व जलसंधारण विभागाचे राज्य सचिव एकनाथ डवले यांच्या पुढाकाराने ‘सुजलाम सुफलाम  वाशिम जिल्हा’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा तसेच प्रत्यक्ष कामाचाही शुभारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव व कारंजा तालुक्यातील गावांची नावे, जलसंधारणाची विविध कामे, उपलब्ध जेसीबी मशिन व संबंधित कर्मचारी, अधिकाºयांची जबाबदारी आदींचा निश्चित कार्यक्रम बुधवारी जाहिर केला. वाशिम तालुक्यात वनविभागाच्यावतीने सहा कामे असून, सहा मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. कृषी विभागाच्यावतीने दोन गावे असून, ८ कामे आहेत. यासाठी ४ जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. मंगरूळपीर तालुक्यातील तीन गावांत शेततळे व अन्य कामे असून, ४ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. मानोरा तालुक्यात तीन गावांतील  जलसंधारणाच्या तीन कामांसाठी पाच मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. मालेगाव तालुक्यात तीन गावांत सहा कामे असून, चार मशिन तर कारंजा तालुक्यातील दोन गावांतील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा