शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतिफ कर्मचारी ; अनेक विभागात खुर्च्या रिकाम्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:31 IST

पंचायत समितीसह अन्य काही कार्यालयात काही कर्मचारी सकाळी १०.३० वाजेपर्यंतही आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला.

- प्रफुल बानगावकर लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पाच दिवसाचा आठवडा झाल्यापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कामकाजाची वेळही बदलली आहे. शनिवार, रविवार असा दोन दिवस सुटीचा आनंद उपभोगल्यानंतर सोमवार, २७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यालयात येणे अपेक्षीत असताना, येथील पंचायत समितीसह अन्य काही कार्यालयात काही कर्मचारी सकाळी १०.३० वाजेपर्यंतही आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला.अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून पाच दिवस शासकीय कामकाजाचे दिवस आहे. त्यामुळे सकाळी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत शासकीय कामकाजाची वेळ ठरविण्यात आली. कारंजा पंचायत समिती येथे सकाळी ९.३० ते १०.१५ वाजतादरम्यान पाहणी केली असता विभागातील पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, बांधकाम, महिला व बालकल्याण, रोहयो कक्ष आदी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत दाखल झाले नाही. आरोग्य विभाग सर्व व पंचायत विभागातील १ व शिक्षण विभागातील १ या प्रमाणे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यासंदर्भात गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी भ्रमनध्वनीला प्रतिसाद दिला नसल्याने प्रतिक्रिया कळू शकली नाही.

तहसिल कार्यालयातील कर्मचारी वेळेवरतहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी वेळेवर येत असल्याचे आढळून आले. नगर परिषद आस्थापन विभाग व अकाऊंट विभागातील काही कर्मचारी वेळेवर आले नसल्याचे दिसून आले. तसेच जन्म मृत्यृ नोंद विभागातील ३ कर्मचारी हजर तर २ कर्मचारी उपस्थित आढळून आले नाहीत.

कोरोना संसर्गाच्या काळात महसूल, आरोग्य, पोलीस व नगर परिषद विभागातील आरोग्य यत्रंणा दिवसरात्र एक करून काम करीत आहे. या तुलनेत ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना काम कमी आहे ते कार्यालयात वेळेवर येत नसतील तर त्यांच्या वरिष्ठांकडून अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-राहुल जाधव,उपविभागीय अधिकारी कारंजा

 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा