शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:02 IST

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर्वेक्षण झाले असून, येत्या आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. 

ठळक मुद्देकृषी विभाग : शेतक-यांना मिळणार भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर्वेक्षण झाले असून, येत्या आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. यावर्षी शेतक-यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बोंडअळीने हल्ला चढवून कापूस उत्पादक शेतक-यांच्या नाकीनऊ आणले. राज्य सरकारने सुरूवातीला बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे (सर्वेक्षण) करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या अनुषंगाने आता सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभाग कामाला लागला आहे. यावर्षी जिल्ह्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, मानोरा या भागात प्रामुख्याने बोंडअळीने कहर माजविल्याने कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले़  शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाकडून आता मदत दिली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी तालुकानिहाय कृषी  साहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक अशा तीन कर्मचाºयांची चमू तयार करण्यात आली असून  बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ७० टक्के सर्वेक्षण आटोपले असून, येत्या आठवड्यात उर्वरीत सर्वेक्षण पुर्णत्वाकडे जाईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस